महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shaniwar Wada Closed In Pune : कोरोनाचे निर्बंध.. पुण्यातील शनिवारवाडा नागरिकांसाठी केला बंद - कोरोना तिसरी लाट

पुण्यातील प्रसिद्ध असा शनिवारवाडा नागरिक आणि पर्यटकांसाठी बंद करण्यात आला ( Shaniwar Wada Closed For Tourist ) आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला ( Shaniwar Wada Closed Due To Covid ) आहे.

पुण्यातील शनिवारवाडा नागरिकांसाठी केला बंद
पुण्यातील शनिवारवाडा नागरिकांसाठी केला बंद

By

Published : Jan 12, 2022, 1:25 AM IST

पुणे - कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पुण्यातील शनिवार वाडा बंद करण्यात आला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आला होता. पण आता तिसऱ्या लाटेच्या ( Covid Third Wave ) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यात राज्य सरकारने कडक निर्बंध ( Maharashtra Government Covid Guidelines ) लागू केले आहेत. त्यात पर्यटन स्थळावर देखील नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळेच पुण्यातील शनिवारवाडा देखील पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आला ( Shaniwar Wada Closed Due To Covid ) आहे.

कोरोनाचे निर्बंध.. पुण्यातील शनिवारवाडा नागरिकांसाठी केला बंद

सर्वसामान्य नागरिकांना 'या' ठिकाणी प्रवेशासाठी बंदी

पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळं आहेत. त्यामुळे या ठिकाणी देखील पर्यटनासाठी पोलिस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत याठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशासाठी बंदी घालण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा तालुक्यात ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे, धरण असल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने सुट्टीच्या दिवशी याठिकाणी येत असतात. मोठ्या संख्येने पर्यटक आल्यानंतर कोरोनाच्या नियमांचे पालन होणार नाही. परिणामी, परिसरातही कोरोनासह ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पर्यटन स्थळे असलेल्या नागरिकांना पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details