पुणे -प्रसिद्ध उद्योजक पद्मभूषण राहुल बजाज यांचे काल पुण्यात निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये काल दुपारी २.३० वाजता निधन झाल्यानंतर आज सकाळपर्यंत त्यांचे पार्थिव रुबी हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आले होत. आज सकाळी ठीक ८.३० च्या सुमारास त्यांचे पार्थिव हे त्यांच्या आकुर्डी येथील निवासस्थानी नेण्यात आले. त्यानंतर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
उद्योगपती राहुल बजाज अनंतात विलीन, शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार - राहुल बजाज अंत्यसंस्कार पुणे
प्रसिद्ध उद्योजक पद्मभूषण राहुल बजाज यांचे काल पुण्यात निधन झाले. संध्याकाळी ठीक ५.३० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले
राज्य सरकारतर्फे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, योग गुरू बाबा रामदेव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता तसेच, विविध मान्यवर उपस्थित होते.
आज सकाळी 9 वाजल्यापासून त्याचे पार्थिव हे त्यांच्या आकुर्डी येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आदी मान्यवर राहुल बजाज यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव सुमारे ४.४५ मिनिटांनी अंत्यसंस्कारासठी वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आले. संध्याकाळी ठीक ५.३० वाजता त्यांचे अंत्यसंस्कार झाले.
हेही वाचा -Valentine's Day Special : राहुलसाठी ती ठरली 'देवता', सामाजिक मानसिकता छेदणारी 'डोळस' प्रेमकथा