पुणे : प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे ( Famous actor and director Praveen Tarde )यांचे फेसबुक खाते सायबर चोरट्यांनी हॅक ( Praveen Tarde Facebook account has been hacked ) केले आहे. याप्रकरणी तरडे यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या नावाने बनावट फेसबुक पेज ( Fake Facebook account ) तयार करून मोठमोठ्या कलाकारांसह इतरांना फोन आणि मेसेज केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
Pravin Tarade : प्रवीण तरडेंचे झाले फेसबुक हॅक; बड्या कलाकारांना फोनसह पाठविण्यात आले मेसेज - पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे ( Famous actor and director Praveen Tarde ) यांचे फेसबुक खाते सायबर चोरट्यांनी हॅक ( Praveen Tarde Facebook account has been hacked ) केले आहे. काही दिवसांपासून त्यांना सायबर चोरट्यांनी घेरले आहे. अभिनेते प्रवीण तरडे यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते ( Fake Facebook account ) उघडून सायबर चोरट्याने काहीजणांसोबत संपर्क साधला आहे.
![Pravin Tarade : प्रवीण तरडेंचे झाले फेसबुक हॅक; बड्या कलाकारांना फोनसह पाठविण्यात आले मेसेज Pravin Tarade](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16600386-thumbnail-3x2-actor.jpg)
अभिनेत्याला सायबर चोरट्यांनी घेरले : अभिनेता प्रवीण तरडे यांच्या विविध चित्रपटांतील भूमिका आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याअनुषंगाने तरडे हे सोशल मीडियावरही टॉप ट्रेडिंगवर आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांना सायबर चोरट्यांनी घेरले आहे. त्यांच्या नावाने बनावट फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांचे मूळ फेसबुक खाते हॅक करण्यात आले आहे. त्याद्वारे अभिनेता तरडे यांच्या नावाने त्याच्या ओळखीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक यांच्यासह कलाकारांना फोन कॉल आणि मेसेज करण्यात येत आहेत. याबाबत तरडे यांना काही मित्रांनी फोन करून विचारणा केली असता, फेसबुक हॅक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानुसार, तरडे यांनी तातडीने रविवारी दि. 9 ऑक्टोबरला पुणे सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.
तरडे यांच्या नावाने उघडले बनावट फेसबुक खाते : अभिनेते प्रवीण तरडे यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडून सायबर चोरट्याने काहीजणांसोबत संपर्क साधला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, त्यांच्या याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, तपास सुरू करण्यात आला आहे. त्यांच्या नावाने कोणी फोन कॉल आणि मेसेज करीत आमिष दाखवीत असल्यास खबरदारी घेण्याचे आवाहन तरडे यांनी प्रेक्षकांना केले आहे.
TAGGED:
बनावट फेसबुक खाते