महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Immoral Relationship : लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने विचारले 'तुझे कोणाकोणासोबत होते शारीरिक संबंध', गुन्हा दाखल

लग्न झाल्यानंतर पहिल्याच रात्री नवऱ्याने त्याच्या बायकोला 'तुझे कोणाकोणासोबत शारीरिक संबंध ( Immoral Relationship ) होते', अशी विचारणा केली. त्यानंतर सातत्याने मारहाण करत घटस्फोटासाठी दबाव टाकल्याने नवऱ्यासह सासू व सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ( Hadapsar Police Station ) आहे. पुण्यात ही घटना घडली.

हडपसर पोलीस स्टेशन
हडपसर पोलीस स्टेशन

By

Published : Jan 21, 2022, 10:18 PM IST

पुणे : पुण्यातील एका उच्चशिक्षीत कुटुंबातील सदस्यांनी आपल्या सुनेचा छळ करत आणि तिला नाईलाजास्तव घटस्फोट देण्यासाठी तिच्यावर बाहेर अनैतिक संबंध ( Immoral Relationship ) असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्या महिलेच्या अमेरिकास्थित पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध 28 वर्षीय विवाहितेने तक्रार दिल्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात ( Hadapsar Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटस्फोटासाठी टाकला दबाव

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ही तरुणी उच्चशिक्षित असून, पुण्यातीलच एका नामांकित कंपनीत काम करते. या महिलेचा पती देखील उच्चशिक्षित असून, तो सॉफ्टवेअर अभियंता आहे. तो सध्या अमेरिकेत असून तेथील एका नामांकित कंपनीत काम करतोय. दरम्यान, लग्न झाल्यापासूनच आरोपीने फिर्यादीचा छळ सुरू केला होता. लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर 'तुझे कोणासोबत शारीरिक संबंध होते का'? अशी सतत विचारणा केली. सातत्याने भांडणे काढून फिर्यादीला अनेकदा मारहाण करत घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकण्यात आला असल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे.

गुन्हा दाखल

दरम्यान या सर्व प्रकारानंतर फिर्यादी महिलेने हडपसर पोलिस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी 498 अ, 323, 504, 506, 34 इत्यादी कलमानुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details