महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पदवीधर मतदारसंघात बोगस मतदार नोंदवण्याचे काम - जयंत पाटील - जयंत पाटील भाजप टीका

महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला जयंत पाटील आले होते. त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

Jayant patil
जयंत पाटील

By

Published : Nov 23, 2020, 4:21 PM IST

पुणे - पदवीधर मतदारसंघात बोगस मतदार नोंदवण्याचे काम झाले आहे. निवडणूक आयोगाने याकडे लक्ष दिले पाहिजे. पुण्यात शेकडो बोगस मतदार नोंदणी झाली आहे. निवडणूक आयोगाने अगोदरच मतदारयादी प्रसिद्ध करणे गरजेचे होते. या मतदार यादीत काहीतरी गौडबंगाल आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून त्याची दखल त्यांनी घ्यावी, असे मत राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

लॉकडाऊनमुळे महसूल जमा होण्यात अडचण -
कोरोना सुरू झाल्यानंतर सरकारी तिजोरी रिकामी झाली असतानाही विनाअनुदानित शाळांंतील शिक्षकांना मदत दिली गेली. सततच्या लॉकडाऊनमुळे सरकारी महसूल जमा होण्यात अडचणी होत्या. विरोधक मंदिरे सुरू करण्यासाठी आंदोलने करत होते. कोरोना रुग्णांत वाढ झाली तर, धोका आणखी वाढला असता, म्हणून जाणीवपूर्वक शेवटचा टप्पा म्हणून प्रार्थनास्थळे खुली केली, असे पाटील यांनी सांगितले.

भाजपने कोरोनाचे राजकारण केले -
लॉकडाऊनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले म्हणून थाळ्या वाजवल्या, घंटा वाजवल्या; यात आम्ही काही राजकारण केले नाही. मात्र, भाजपने पावलापावलावर राजकारण केले. बेजबाबदार विरोधी पक्ष कसा असू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले.

चंद्रकांत पाटलांवर टीका -

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पदवीधर लोकांचे प्रश्न सोडण्यास किती तत्पर होते. कोथरुड मतदारसंघातही त्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडले नाही. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना विचारा, त्यांनी त्याठिकाणी नेमके काय प्रश्न उपस्थित केले? असा टोला त्यांनी पाटील यांनी लगावला.

ABOUT THE AUTHOR

...view details