पुणे-पत्नीला पोलीस अधिकारी असल्याचे भासवण्यासाठी पोलिसांचा गणवेश घालून फिरणाऱ्या एका तोतयाला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. भाऊसाहेब महादेव गोयकर (वय 25 वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस गस्त घालत असताना, त्यांना पोलिसांच्या गणवेशात एक व्यक्ती दिसला. त्याच्या खांद्यावर मपो ऐवजी मपोसे असे लावले होते. त्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आला. पोलिसांनी त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली असता, त्याच्याकडे ओळखपत्र नसल्याने पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.