महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

डॉक्टर असल्याचे सांगून महिलेवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरलची धमकी दिल्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून अटक

पोलिसांनी अशी माहिती दिली अशी की, पीडितेच्या कौटुंबिक वादाचा फायदा घेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तिच्यासोबत घरामध्ये जबरदस्तीने लग्नही केले. त्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 16 लाख 65 रुपये घेऊन फसवणूक केली.

पुणे पोलीस
पुणे पोलीस

By

Published : Oct 28, 2021, 3:38 PM IST

पुणे -डॉक्टर असल्याचे भासवून आरोपीने 29 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तसेच आपले म्हणणे ऐकले नाही तर अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पुण्यातील विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायक रुद्रा रमेशराव उर्फ किशन रमेशराव जाधव (वय 33) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.


नायक रुद्रा रमेशराव उर्फ किशन रमेशराव विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 29 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली. हा प्रकार मार्च 2021 ते ऑक्टोबर 2019 या काळात वेळोवेळी घडल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

हेही वाचा-डॉक्टरकडून दिव्यांग मुलीवर अत्याचार, सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल



नोकरीच्या आमिषाने 16 लाखांची फसवणूक

पोलिसांनी अशी माहिती दिली अशी की, आरोपीने आपण ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असल्याचे पीडित महिलेला सांगितले. तसेच स्वतःचे नर्सिंग कॉलेज आणि फार्मसी कॉलेज असल्याचे सांगून विमाननगर परिसरातील फ्लॅटमध्ये तक्रारदार महिलेला बोलावून घेतले. तिथे त्याने पीडित महिलेला खोटे आयकार्ड आणि वैद्यकीय डिग्रीचे बनावट कागदपत्रे दाखवून ती खरी असल्याचे भासविले. त्यानंतर पीडितेच्या कौटुंबिक वादाचा फायदा घेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तिच्यासोबत घरामध्ये जबरदस्तीने लग्नही केले. त्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 16 लाख 65 रुपये घेऊन फसवणूक केली.

हेही वाचा-रायबरेलीतील विधवा पीडितेवर बलात्कार करणाऱ्या 'सलमान'ला भिवंडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या


आरोपीचा त्रास असह्य झाल्याने तक्रार

दरम्यान काही काळानंतर पीडितेला आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने आरोपीला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आरोपीने तू माझे ऐकले नाही तर अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी दिली. तसेच पीडितेच्या पतीला जीवे मारण्याची आणि नोकरी लावण्यासाठी घेतलेल्या पैशाच्या व्यवहारांमध्ये अडकिवण्याची धमकी दिली. सुरुवातीच्या काही काळात बदनामी होईल या भीतीने पीडितेना तक्रार दिली नव्हती. परंतु आरोपीकडून होणारा त्रास असह्य झाल्याने पीडितेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

हेही वाचा-धक्कादायक : बसस्थानकात ४२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; चार जणांवर गुन्हा दाखल

दरम्यान, राज्यभरात महिलांवरील बलात्काराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी येथे बसस्थानक परिसरात महिलेवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री १ वाजेदरम्यान घडली आहे. याप्रकरणी ४ संशयितांविरोधात वणी पोलीस स्थानकात बलात्कार व अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details