महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vijay Shivtare : विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी; शिवतारे म्हणाले, जहा शिंदे, फडणवीस... - Expulsion of Vijay Shivtare from Shiv Sena

शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) हे मध्यंतरी एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर पक्षाचे नेते संजय राऊत यांच्यावर जाहीर नाराजगी व्यक्त करत जोरदार टिका देखील केली होती. त्यांच्या या निर्णयाने पक्षश्रेष्ठींनी दखल घेत त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली ( Expulsion of Vijay Shivtare from Shiv Sena ) आहे.

Expulsion of Vijay Shivtare from Shiv Sena
विजय शिवतारे

By

Published : Jul 16, 2022, 6:01 PM IST

पुणे - शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्यावर माजी मंत्री विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) यांनी प्रतिक्रिया दिली ( Expulsion of Vijay Shivtare from Shiv Sena ) आहे. ते म्हणाले की, मला खंत वाटली की 13 वर्ष शिवसेनेचे विचार गोरगरीबापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यात मी यशस्वी झालो. बारामती मतदार संघाला लागून असलेला हा पुरंदर हवेली मतदार संघात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मी प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी देखील झालो. जर याचा फळ हकालपट्टी म्हणून ते देत असतील तर काय म्हणणार. आता जहा शिंदे वाहा शिवतारे आणि जहा देवेंद्र वाहा शिवतारे असे यावेळी शिवतारे यांनी म्हटले आहे.

विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया

पक्षातून हकालपट्टी - शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे हे मध्यंतरी एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर पक्षाचे नेते संजय राऊत यांच्यावर जाहीर नाराजगी व्यक्त करत जोरदार टीका देखील केली होती. त्यांच्या या निर्णयाने पक्षश्रेष्ठींनी दखल घेत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. शिवसेनेचे बंड नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड केल्यानंतर शिवसेनेतील माजी आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष देखील एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. अश्यातच राज्यभर शिवसैनिक आणि शिंदेगट यांच्यामधील संघर्ष पाहायला मिळाला. पक्षश्रेष्ठींनी याची दखल घेत जे जे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली असून पुणे जिल्ह्यातील माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या देखील आता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या मुखपत्रातून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. पक्षाच्या विरोधात काम केल्याने आणि पक्षाची शिस्त मोडल्यानंतर विजय शिवतारे यांना शिवसेनेने अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे. विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार असून ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करत होते. विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर त्यांच्यावर हकालपट्टी कारवाई करण्यात आली आहे. विजय शिवतारे यांनी आपण शिंदे गटात जात असल्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता.

हेही वाचा -Chhagan Bhujbal On CM Shinde : काय पाऊस, काय पूर, काय खड्डे, समद ओके...; छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

ABOUT THE AUTHOR

...view details