पुणे - पुणे शहरातील राजकारणात गेली अनेक वर्ष अधिराज्य गाजवणारे नाव म्हणजे काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश कलमाडी. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून राजकारणापासून दूर झालेले सुरेश कलमाडी यांनी पुन्हा राजकारणात उडी टाकली असल्याचे चित्र दिसत आहे. दहा वर्षानंतर पुणे महानगरपालिकेत आज शुक्रवारी (दि. 5 ऑगस्ट)रोजी काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश कलमाडी यांनी महापालिका आयुक्त यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळेस कलमाडी यांना महापालिकेत येण्याचा निमित्त विचारले असता ते म्हणाले की आत्ता यापुढे असंच येत राहील.
पुणे शहरात काँग्रेसला भरभराटी - सुरेश कलमाडी यांनी म्हटल्यानुसार आता यापुढे असाच येत राहील त्याचा अर्थ विरोधकांना हा इशारा तर नव्हे ना. अशी चर्चा सुरू आहे. पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी सक्रिय असताना काँग्रेस भवन तसेच पुणे शहरात काँग्रेसला भरभराटी होते पण कलमाडी हे राजकारणापासून दूर गेल्यानंतर काँग्रेस मधील अंतर्गत गटबाजी तसेच काँग्रेसचे शहरातील वर्चस्व काहीसे कमी होत गेले. पण आता कलमाडी यांच्या महापालिकेतील एंट्रीने काँग्रेसने आपले शेवटचे अस्त्र काढले की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.