महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Funeral On Rahul Bajaj : उद्योजक राहुल बजाज यांच्या पार्थिवावर दुपारी होणार अंत्यसंस्कार - राहुल बजाज यांच्यावर आज अंत्यसंस्कार

प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांच्यावर आज रविवारी (दि. १3 फेब्रुवारी)रोजी पुण्यात 4 :30 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. (Rahul Bajaj) दरम्यान, आकुर्डी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

उद्योजक राहुल बजाज यांच्या पार्थिवावर दुपारी होणार अंत्यसंस्कार
उद्योजक राहुल बजाज यांच्या पार्थिवावर दुपारी होणार अंत्यसंस्कार

By

Published : Feb 13, 2022, 9:19 AM IST

Updated : Feb 13, 2022, 6:51 PM IST

पुणे - प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांच्यावर आज रविवारी (दि. १3 फेब्रुवारी)रोजी पुण्यात 4 :30 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. (Rahul Bajaj) दरम्यान, आकुर्डी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राहुल बाजाज हे बजाज उद्योग समुहाचे बराच काळ प्रमुख होते. वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी बजाज ऑटोची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. त्यांना (२००१)साली भारत सरकारने 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केले. (Rahul Bajaj Passes Away) गेल्या पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांचा मोटा वाटा आहे.

बजाज उद्दोग समूहाला मोठे करण्यात महत्त्वाचे योगदान -

प्रसिद्ध उद्योजक आणि बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे निधन झाले आहे. पुण्यात त्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 साली झाला होता. त्यांनी १९६८ मध्ये बजाज समूहाचे कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे.

व्हिडिओ

'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित -

2001 मध्ये राहुल बजाज यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. तसेच त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून 'एमबीए'चेही शिक्षण पूर्ण केले होते.

बजाज ऑटोच्या यशात मोलाचा वाटा -

राहुल बजाज सन १९६८ मध्ये बजाज ऑटोचे सीईओ झाले. यानंतर ३० व्या वर्षी जेव्हा राहुल बजाज यांनी ‘बजाज ऑटो लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा हे पद मिळविणारे ते सर्वात तरुण भारतीय असल्याचे सांगितले जाते. यानंतर बजाजने एका निरंकुश पद्धतीने उत्पादन केले आणि स्वत:ला देशातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक बनविण्यात यश मिळविले. वर्ष १९६५ मध्ये ३ कोटींच्या उलाढालीवरून सन २००८ मध्ये बजाजने सुमारे १० हजार कोटींची उलाढाल गाठली.

दिला होता राजीनामा -

गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. बजाज ऑटोला आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांना महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा होता. राहुल बजाज यांच्यानंतर ६७ वर्षीय नीरज बजाज यांच्याकडे बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती.

हेही वाचा -75 Years of Independence : भारत मातेचे वीर सुपूत्र बटुकेश्वर दत्त यांची कहाणी

Last Updated : Feb 13, 2022, 6:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details