सोलापूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ,सगळ्यात पुढे होते ते, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू MLA Shahaji Bapu .'काय झाडी, काय डोंगर, काय हाटिल' या डायलॉगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले शहाजीबापू हे संपूर्ण राज्यभर फिरून शिंदे गटाची भूमिका मांडताना दिसत आहेत. मात्र आता शहाजीबापूंना त्यांच्याच मतदार संघात घेरण्याची तयारी उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी केली आहे.
जोरदार शक्ती प्रदर्शनओबीसी नेते लक्ष्मण हाके OBC leader Laxman Hake यांना पक्षात प्रवेश देत उद्धव ठाकरे यांनी सांगोल्यातच शहाजीबापू पाटील यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. त्यानंतर आता येत्या रविवारी सांगोल्यात खासदार विनायक राऊत MP Vinayak Raut यांच्या उपस्थितीत लक्ष्मण हाके यांनी शिवसैनिकांचा भव्य मेळावा आयोजित केला आहे. सांगोल्यात या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.