School Reopening In Pune : पुण्यात आजपासून प्राथमिक शाळेला सुरवात...विद्यार्थ्यामध्ये उत्साह - शाळेत विद्यार्थ्यांचा उत्साह
पुणे शहरातील शाळा 15 डिसेंबरपर्यंत (Pune School strats from 15th Dec) सुरू न करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने (Pune Muncipal Corporation) घेतला होता. कोरोना नियमांचे पालन करत शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
पुणे :-पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा (School Reopening IN Pune) आजपासून सुरू करण्यात आले आहे. राज्यातील शाळा 1 डिसेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, पुणे शहरातील स्थानिक प्रशासनाने याला विरोध दर्शवला होता आणि पुणे शहरातील शाळा 15 डिसेंबरपर्यंत (Pune School strats from 15th Dec) सुरू न करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला होता. आता महापालिकेने महापालिका हद्दीतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय आजपासून घेतला आहे. पुण्यातील ज्ञानगंगा इंग्लिश मिडीयम शाळेत प्रशासनाने दिलेल्या नियमावलीच काटेकोरपणे पालन करून शाळेत विद्यार्थ्यांच स्वागत करण्यात आलं आहे.गेल्या 2 वर्षानंतर शाळेत पून्हा एकदा येताना या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर वेगळंच आनंद पाहायला मिळाला.