पुणे :शहरातील कोथरुड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली, पिंपरी आणि चिंचवड मधील वीज पुरवठा सकाळी 6 वाजेपासून खंडित झाला ( No Electricity Pune District ) आहे. हा वीज पुरवठा सुरुळीत होण्यासाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्वाच्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये ५ ठिकाणी बुधवारी दि. ९) पहाटे ४.३०च्या सुमारास बिघाड (ट्रीपिंग) झाला. दाट धुके व दवं यामुळे टॉवर लाईन मध्ये बिघाड झाल्याची शक्यता असल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आले आहे. दोन ४०० केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्र बंद असल्याने पर्यायी वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही.