पुणे - राज्यात एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज्यभरात शिवसेना आक्रमक ( Shiv Sena aggressive in maharashtra ) झालेली पहायला मिळत आहेत. अनेक शिवसैनिकांकडून आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड ( MLA office vandalized ) केली जात आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय कक्ष चालवणाऱ्या राजाभाऊ भिलारे ( Rajabhau Bhilare ) यांच्या कार्यालयात येऊन देखील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळीमा ( Defamation Eknath shinde) फासली आहे. त्यामुळे भिलारे हे आक्रमक झाले आहे. आता मी एकनाथ शिंदे यांच्या गटाचा असून एकनाथ शिंदे जिथे जाणार तिथे मी जाणार असल्याचे भिलारे यांनी सांगितले.
तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडले - काल शिवसैनिकांनी नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासत आंदोलन केले होते. आता मंत्री तानाजी सावंत यांचे कार्यालय संतप्त शिवसैनिकांनी फोडले आहे. शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे. त्यांनी तानाजी सावंत यांच्या कार्यालयातील टेबल, खुर्च्या, काचांची तावदाने फोडून टाकली आहेत. त्यामुळे या घटनेचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्याता निर्माण झाली आहे. दरम्यान, आज सकाळी बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आमदाराच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे.