पुणे - दोन वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे देशभरात कोणातही सण साजरा केला गेला नाही. मात्र दोन वर्षानंतर आता निर्बंध हटवल्यानंतर आता महत्वाचे सण उत्साहात साजरे केले जाऊ लागले आहेत. देशात मोठ्या संख्येने साजरा होणारा सण म्हणजे मुस्लिम समाजाचा सण रमजान ईद ( Ramadan Eid ) . मुस्लिम समाजातील नागरिक या काळात महिन्याभराचा उपवास करतात. रमजान ईदच्या दिवशी शिरखुरमा तयार केला जातो. याच शिरखुरमाच्या साहित्य खरेदीसाठी बाजार पेठात मोठी गर्दी पाहायला मिळाली.
साहित्यात जवळपास 15 ते 20 टक्क्यांनी वाढ -गेल्या काही महिन्यांपासून महागाईने मोठ्या प्रमाणावर डोकेवर काढले आहे. शिरखुरमा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यात जवळपास 15 ते 20 टक्क्यांनी वाढ ( Sheer Khurma ingredients Price hike ) झाली आहे. त्यामुळे दुकानदारांना काही प्रमाणात माल विक्रीसाठी ठेवावा लागत आहे. कारण माल घेण्यासाठी येणारे ग्राहकही तेवढया प्रमाणात येत नाही. कोरोनानंतर जरी सर्व सुरू झाले असले तरी महागाईमुळे मात्र सर्वांचेच कंबरडे मोडले आहे.