पुणे: राज्याच्या राजकारणात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट शिवसेनेत झाले आहे. या दोन्ही गटात दररोज आरोप प्रत्यारोप होत असून यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाला आहे. नुकताच दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. त्यात दोन्ही गटांनी एकमेकांवर चांगलीच आगपाखड केली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर टिका केली. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दिपक केसरकर यांना विचारल असता ते म्हणाले की, मी उद्धव ठाकरे यांना बघून शिवसेनेत आलो होतो. त्यांची प्रतिमा त्यांचं चांगलपण बघून मी शिवसेनेत गेलो होतो. पण दसऱ्याच्या मेळाव्यात त्यांचं भाषण ऐकून मी अस्वस्थ झालो. आणि रात्रभर झोपलो नाही. जेव्हा मी अस्वस्थ होतो, तेव्हा शिर्डीला जातो. आणि लगेच शिर्डीला गेलो आणि मन शांत केलं. मी उद्धव ठाकरे यांच्यावर बोलणार नाही, असे ठरवलं होतं. मात्र ज्या प्रकारे त्यांनी टीका केली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून त्यावर पक्षाच्या प्रवक्ता म्हणून नक्कीच मत मांडेल असे यावेळी शिक्षणमंत्री दिपक केसरकर Education Minister Deepak Kesarkar म्हणाले आहेत.
शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दिपक केसरकर गृहमंत्री त्याबद्दल निर्णय घेतीलपाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने टाकण्याबाबत बालभारती येथे विषय तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, शिक्षण संचालक महेश पालकर आदी उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी केसरकर यांना आदिपुरुषावर बंदी घालण्याची मागणी राम कदम यांनी केली आहे. यावर त्यांना विचारल असता, ते म्हणाले की ही त्यांची वैयक्तिक भुमिका आहे, बंदी घालायची की नाही हे ठरवण्यासाठी सेन्सॉर बोर्ड आहे. गृहमंत्री त्याबद्दल निर्णय घेतील, असे यावेळी शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणाले आहेत.
टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांना पुन्हा परीक्षा देता येईलअंधेरी पोटनिवडणूक बाबतीत केसरकर यांना विचारलं असता ते म्हणाले की अंधेरी पोटनिवडणुकीत आमची भाजपसोबत युती आहे. त्यांनी जर आमच्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडलं, तर आम्ही एका आमदारकीसाठी आम्ही हट्ट करण्यात अर्थ नाही, अस यावेळी म्हणाले. टीईटी बाबत केसरकर यांना विचारलं असता ते म्हणाले की, टीईटी परिक्षेतील घोटाळ्यात जे दोषी आढळलेत त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल. पण माझ्या शरीरात एका बापाचे ॠदय देखील आहे. त्यामुळे काही वर्षांनंतर टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांना पुन्हा ही परीक्षा देता येईल. मात्र आता जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल. दोषी वगळून इतरांचा निकाल लवकरच लावण्यात येईल, असे यावेळी शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणाले आहेत.
अंतिम निर्णय घेण्यात येईलसर्वसामान्य शेतकरी किंवा कष्टकरी माणसाला मुलांसाठी वही घेणेही कठीण असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पुस्तकासोबत वह्यांची पाने जोडण्याबाबत तज्ज्ञांनी विचार करावा आणि त्यादृष्टीने सूचना कराव्यात, असे देखील यावेळी दीपक केसरकर यांनी म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला दिशा देणारा उपक्रम म्हणून शिक्षकांनी या उपक्रमकडे पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. शिक्षकांनी पुस्तकातील विषयावर दिलेली टिपणे विद्यार्थ्याने या पानांवर लिहावे अशी अपेक्षा आहे. त्यावरून शिक्षकांनी वर्गात घेतलेला अभ्यासही लक्षात येईल. गरीबतल्या गरीब मुलालाही वह्यांची पाने असलेली पुस्तके उपयुक्त ठरली पाहिजेत. प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येईल आणि पालक शिक्षकांकडून येणाऱ्या सूचनांच्या आधारे अंतिम निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थी किती पानांचा लिखाणासाठी उपयोग करतात. याचाही अभ्यास करण्यात यावा. यासाठी तज्ज्ञ शिक्षकांची एक समिती नेमण्यात येणार असून समिती सदस्य या उपक्रमाबाबत शिक्षकांना माहिती देण्यासोबत अभ्यासही करेल. असे देखील यावेळी शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणाले आहेत.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्याचे व्यक्तिमत्व घडविणे, हे अंतिम उद्दिष्ट आहे. शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविताना अनुभवाने त्यात बदलही करता येईल. शालेय शिक्षणाची गुणवत्ता उत्तम राहावी. यासाठी आवश्यक उपक्रम राबविताना मुलांवर अभ्यासाचा बोजा पडणार नाही, याचीही दक्षता घ्यावी. शालेय स्तरावर 3 महिन्यांनी परीक्षा घेण्याचा विचार व्हावा. तिमाहीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष देऊन त्यांना सहामाही परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्यादृष्टीने तयारी करून घेता येईल. सहावीपासून राज्यात एकाचवेळी कलचाचणी घेण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना आवडीनुसार व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविता येईल. मुलांना पोषण आहारातून अधिक पौष्टिक तत्व मिळावे. यदृष्टीनेही अनुकूल बदल करावे लागतील, असेही शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले आहे.