पुणे -देश आर्थिक गर्तेत सापडलेला आहे. मात्र, सरकारला त्याचे गांभीर्य नाही. सरकारने आपला अहंकार सोडावा आणि या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी निष्पक्ष अर्थ तज्ञांच्या गोलमेज परिषदेचे आयोजन करावे, असे मत नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी पुण्यातील एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला.
देशांमध्ये असलेली मंदी ही दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत जात असून उद्योग क्षेत्रापासून विविध क्षेत्रांमध्ये मंदीची मोठी लाट आहे. सरकारला मात्र याचे गांभीर्य नाही. आर्थिक परिस्थिती बिकट असताना सरकार आणि या सरकारमधील मंत्री बेजबाबदार विधान करत आहेत. या सरकारने अहंकार सोडून आर्थिक मुद्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.