महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Edible Oil Prices Fell : गृहिणींचा स्वयंपाक स्वादिष्ट होणार; खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी घट - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुरवठा वाढल्याने तेलाच्या किमतीत घट

देशात खाद्य तेलाचे दर ( Edible oil prices fell ) घसरले आहेत. मागिल महिन्यात 15 लिटर तेलाचा डबा जो 2700 रुपयाला मिळत होता. तो आत्ता 2500 रुपयांमध्ये मिळत आहे. एकूणच 15 लिटरच्या डब्या मागे 500 ते 700 रुपये एवढी घट झाली आहे. तर किलो मागे 40 ते 50 रुपये एवढी घट झाली आहे, अशी माहिती तेल व्यापारी रायकुमार नाहार यांनी दिली आहे.

Edible Oil Prices Fell
Edible Oil Prices Fell

By

Published : Jul 27, 2022, 7:23 PM IST

Updated : Jul 27, 2022, 7:38 PM IST

पुणे -गेल्या काही महिन्यांपासून महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल डिझेलपासून ते एलपीजीपर्यंत आणि खाद्यपदार्थांपासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. वाढत्या महागाईमुळे खरेदीचे प्रमाण देखील घटले आहे. मात्र वाढत असलेल्या माहागाईत खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जागतिक बाजारपेठेत खाद्य तेलाचा पुरवठा वाढल्याने त्याचा परिणाम भारतात देखील झाला आहे. यामुळे देशात खाद्य तेलाचे दर ( Edible oil prices fell ) घसरले आहेत. मागिल महिन्यात 15 लिटर तेलाचा डबा जो 2700 रुपयाला मिळत होता. तो आत्ता 2500 रुपयांमध्ये मिळत आहे. एकूणच 15 लिटरच्या डब्या मागे 500 ते 700 रुपये एवढी घट झाली आहे. तर किलो मागे 40 ते 50 रुपये एवढी घट झाली आहे, अशी माहिती तेल व्यापारी रायकुमार नाहार यांनी दिली आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी



रशिया आणि युक्रेन युद्धाचा बसला होता फटका :गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा मोठा फटका या दोन देशांना तर मोठ्या प्रमाणात बसला. पण त्याचा मोठा परिणाम हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर देखील झाला. रशिया आणि युक्रेन हे दोन देश अनेक वस्तूंची निर्यात करतात. मात्र युद्धामुळे निर्यात ठप्प असल्याने अनेक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला, परिणामी भाव वाढले. भारत रशिया आणि युक्रेनकडून जवळपास सत्तर टक्के सूर्यफूल तेलाची आयात करतो. मात्र युद्धामुळे निर्यात बंद असल्याने त्याचा परिमाण हा तेल पुरवठ्यावर झाला होता. आणि खाद्य तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली मात्र आता आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या पुरवठा वाढल्याने खाद्य तेलाच्या दरामध्ये घट झाली आहे.


असे होते दर : जेमिनी - 2750-2500, सोयाबिन - 2700-2200, पाम तेल -2700-2000

हेही वाचा -मुसळधार पावसाचा मराठवाड्याला फटका! 43 जणांचा मृत्यू, 539 जणावरे दगावली; सहा लाख शेतकरी बाधित

Last Updated : Jul 27, 2022, 7:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details