पिंपरी-चिंचवड / पुणे : दोन वर्षांनंतर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव ( Ganeshotsav ) साजरा केला जाणार आहे. या वर्षी उत्सवावर कुठलेही निर्बंध नाहीत. त्यामुळे आतापासूनच गणेशमूर्तीची ( Ganesh Idol ) बुकिंग करण्यासाठी गणेशभक्त गणेशमूर्ती कारखान्यात गर्दी करताहेत. परंतु, पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने याचा थेट फटका गणेशभक्तांना बसला आहे. कारण या वर्षी गणेशमूर्तींचे 30 ते 35 टक्क्याने दर वाढले आहेत. यामुळे गणेशभक्तांमध्ये ( Ganesha Devotees ) काही प्रमाणात नाराजी आहे. महागाई वाढली तरी उत्सव जोमाने करू, अशी प्रतिक्रिया गणेशभक्त देत आहेत.
मूर्तीचे बुकींग सुरू झाले : दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. तशी तयारीदेखील पाहायला मिळत आहे. कोरोना काळात अनेकांनी साध्या पद्धतीने गणपती उत्सव साजरा केला. जिथे 5 ते 6 फुटांची गणेशमूर्ती होते, तिथे दीड-दोन फुटांच्या मूर्ती बसवल्या गेल्या. या वर्षी नागरिकांमध्ये उत्साह आहे. मूर्तींचे बुकिंग सुरू झाले आहे. असे कारखानदार रवींद्र चित्ते यांनी सांगितलं आहे.