पुणे -राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी समर्थ रामदास स्वामी (Samarth Ramdas) आणि छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासंदर्भात एक वक्तव्य केले होते. यावरुन आता नवा वाद सुरू झाला आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ आज राज्यभर आंदोलने करण्यात आली. यासर्व संदर्भात माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ लेखक श्रीपाल सबनीस (Dr. Shripal Sabnis) यांनी 'ई टीव्ही भारत'सोबत बोलताना तो इतिहास मांडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची कधीच भेट झाली, असे सबनीस म्हणाले.
डॉ. श्रीपाल सबनीस यांची संपूर्ण मुलाखत पाहा या लिंकवर-
VIDEO : समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हतेच - श्रीपाल सबनीस
नेमका छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचा इतिहास काय आहे? खरंच छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदास स्वामी यांना भेटले का? समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते का? राज्यपाल कोश्यारी यांनी अशा पद्धतीने विधान करणे कितपत योग्य आहे? असे अनेक प्रश्न राज्यपाल कोश्यारी यांच्या त्या वक्तव्यानंतर उपस्थित झाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट झालेली नाही -
स्वराज्याच्या संकल्पनेच्या आणि स्वराज्याच्या निर्मितीत समर्थ रामदास स्वामी यांचा कुठेही वाटा नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची कधीही भेट झालेली नाही. त्यामुळे समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नव्हतेच. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे विधान हे घातकी, विषारी आहे, असे श्रीपाल सबनीस म्हणाले.