महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

SPECIAL : मुलाच्या अभ्यासासाठी गच्चीवर फुलवली बाग, 600 हून अधिक फुलपाखरांचा जन्म.. पाहा व्हिडिओ - Dr Patwardhan butterfly pune

फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी आणि मुलाला शालेय अभ्यासक्रमात मदत व्हावी म्हणून डॉ. पटवर्धन यांनी आपल्या गच्चीवरच फुलपाखरूंसाठी बाग तयार केली आहे. या बागेत डॉ. पटवर्धन यांना आतापर्यंत सुमारे ६०० हून अधिक फुलपाखरांचा जन्म आणि मृत्यू पहायला मिळाला आहे.

Dr Patwardhan butterfly pune
डॉ पटवर्धन फुलपाखरू बाग पुणे

By

Published : Mar 1, 2022, 7:18 PM IST

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना नुकसान झाले. तर, काहींनी याच लॉकडाऊनचा फायदा घेत अनेक नवनवीन उपक्रम हातात घेतले. असाच एक उपक्रम फुलपाखरांचा अभ्यास करणारे डॉ. अंकुर पटवर्धन यांनी राबवला. फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी आणि मुलाला शालेय अभ्यासक्रमात मदत व्हावी म्हणून त्यांनी आपल्या गच्चीवरच फुलपाखरूंसाठी बाग तयार केली आहे. या बागेत डॉ. पटवर्धन यांना आतापर्यंत सुमारे ६०० हून अधिक फुलपाखरांचा जन्म आणि मृत्यू पहायला मिळाला आहे.

माहिती देताना डॉ. पटवर्धन आणि 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा -सरकारने लवकरात लवकर आमच्या मुलांना सुखरूप मायदेशी आणावे; युक्रेनमध्ये अडकलेल्या सपना पठारेच्या आईची हाक

डॉ. अंकूर पटवर्धन यांनी २०२० मध्ये फुलपाखरांचे गार्डन तयार केले

गरवारे महाविद्यालयातील आबासाहेब कुलकर्णी जैवविविधता विभागाचे प्रमुख व फुलपाखरू संशोधक डॉ. अंकूर पटवर्धन यांनी २०२० मध्ये फुलपाखरांचे गार्डन तयार केले आणि त्यानुसार विविध वनस्पती आणून टेरेसवर बाग तयार केली. त्यानंतर प्रत्येक फुलपाखराचा अभ्यास करून त्याच्या नोंदी देखील ठेवल्या आहेत. त्यांच्या नोंदीनुसार आजपर्यंत ६०० हून अधिक फुलपाखरांचा जन्म त्यांच्या गार्डनमध्ये झाला आहे.

फुलपाखरू गार्डनमध्ये १३ प्रजातीची फुलपाखरे

२०२० पासून गार्डनमध्ये फुलपाखरांचा अभ्यास सुरू केला. तेव्हापासून १३ प्रजातीची ६०० हून अधिक फुलपाखरू पाहिली. जन्म आणि मृत्यू पाहणे एक अविस्मरणीय अनुभव आहे. सर्वाधिक ब्लू टायगर (१२०), काॅमन मोरमाॅन (१२०), प्लेन टायगर (१२०), काॅमन लाइम (७५), व्हाइट ऑरेंज पिफ, पायोनियर, टेल्ड जे आदी फुलपाखरे आतापर्यंत पाहिली आहे. अनेक फुलपाखरू हे वातावरणीय बदलामुळे येत असतात. काही पावसाळ्यात तर, काही हिवाळ्यात तर, काही उन्हाळ्यात येत असतात, असे देखील पटवर्धन म्हणाले.

एक फुलपाखरू जुलै २०२१ पासून कोशात... ते अजूनही कोशातच आहे

सुरवातीला फुलपाखराने अंडी दिल्यावर त्याच्यातून अळी बाहेर येते. अळी भरपूर खाऊन घेत कोशात जातात. त्यानंतर दहा ते पंधरा दिवस कोशात राहिल्यावर त्यातून फुलपाखरू बाहेर पडते. परंतु, त्यांच्याकडे एक फुलपाखरू आहे जो जुलै २०२१ मध्ये कोशात गेला ते अजूनही कोशातच आहे. ते आतमध्ये जिवंत आहे. कारण तो कोश हिरवागार आहे. कारण आतील फुलपाखरू मृत झाले तर कोश काळा पडतो. या फुलपाखरूला अजून बाहेरील वातावरण पोषक वाटत नाही. कदाचित या पावसाळ्यात ते बाहेर येऊ शकते. तेव्हा त्याला एक वर्ष पूर्ण झालेले असेल. अशा प्रकारची नोंद ही जगातील कदाचित पहिलीच असणार आहे. बाहेरील वातावरण पोषक नसेल तर,कोशातून फुलपाखरू बाहेर येत नाही. हे फुलपाखरू मात्र आतमध्ये एवढे दिवस का राहीले, त्याचे संशोधन करणे आवश्यक आहे. आणि तसे संशोधन देखील करणार असल्याचे यावेळी पटवर्धन यांनी सांगितले.

हेही वाचा -Omkareshwar Temple in Pune : गुरू शिष्यांच्या दृढ नात्याचे प्रतीक ओंकारेश्वर मंदिर

ABOUT THE AUTHOR

...view details