पुणे -श्रद्धा ही प्रत्येकाच्या मनात आहे. मी पण अस्थीक आहे. आम्ही देखील जिथंजिथं दौरे करत असतो तिथं सोशल डिस्टनसिंग पाळतो. परंतु, काही लोकं मास्क न वापरताच आंदोलन करतात आणि परत म्हणतात आम्हाला कोरोना होत नाही. हे चुकीचं असून, आपण कोणी सुपरमॅन जरी असलो तरी सुपर निरोगी माणूस नाही ही जणीव सर्वांनी ठेवली पाहिजे, असे म्हणत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या विरोधकांना टोला लगावला आहे.
डॉ. निलम गोऱ्हे - उपसभापती, विधानपरिषद हेही वाचा -तक्या कमी वयात सिद्धार्थ शुक्लाचे जाणे धक्कादायक - सुनील पाल
विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱहे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेतील कामकाजाचा आढावा महापालिका सभागृहात घेण्यात आला. त्यामध्ये कोरोना महामारीच्या काळात महापालिकेने केलेल्या नाविन्यपूर्ण कामाचा आढावा, कोरोना काळात सामान्य नागरिक कामगार शेतकरी मजूर यांना मदत देण्यासाठी शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या योजनांचा आढावा, कृषी विभाग कामगार विभाग परिवहन विभाग तसेच आदिवासी कल्याण विभाग महिला व बाल विकास विभाग सार्वजनिक आरोग्य विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तिसऱ्या लाटेच्या पश्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वार्ड करा -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्यावतीने पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात अंदाजे 30 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून नागरिकांना मदत करण्यात आली आहे. तसेच कोरोनामुळे कुठे आणि निधन झालेल्या महापालिकेतील 88 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपात्त्वावर प्रलंबित नियुक्त्या तत्काळ देण्याच्या कार्यवाही करा.
तसेच सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बांधकाम कामगार घरेलू तसेच वेगवेगळ्या कामात कार्यरत कामगारांची नोंदणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागाची मदत घेऊन विशेष मोहीम राबवा. महिला बालविकास विभागाने कोरोनामुळे पतीचे निधन झाल्याने 407 विधवा महिलांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांच्या गरजा लक्षात घेऊन समुपदेशन करा. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, महिला विकास आर्थिक विकास महामंडळ यांसारख्या महामंडळाची मदत घेऊन विधवा महिलांचे पुनर्वसन करा, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल 15 ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करा, कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवा. तसेच कोरोनामुक्त गाव या उपक्रमाप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वार्ड करा, असे निर्देश निलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा -मुख्य मंदिरामध्येच होणार 'दगडूशेठ'चा गणेशोत्सव; वाचा यंदाचे वैशिष्टये