महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

डेंग्यूचा नवा व्हेरीयंट DENV-2 च्या रुग्णसंख्येत वाढ.. प्लेटलेट्स कमी होण्याबरोबरच मूत्रपिंड व यकृतावरही परिणाम

राज्यात आत्तापर्यंत डेंग्यूचा डीईएनव्ही 1 नावाचा व्हेरियंट आढळत असे. यात ताप येणे, हातापायाची हाडे दुखणे आणि डोळ्यांच्या मागे डोकं दुखणे अशा पद्धतीची लक्षणे असत. परंतु या वर्षी डी 1 बरोबर डी2 चे देखील विषाणू सापडले आहेत. यात लक्षणे तीच असली तरी प्लेटलेट्सचे प्रमाण खूप वेगाने कमी होते. याचा मूत्रपिंड व यकृतावरही परिणाम होत असल्याचे डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले.

new variant of dengue
new variant of dengue

By

Published : Oct 4, 2021, 3:17 PM IST

Updated : Oct 16, 2021, 12:27 PM IST

पुणे - पावसाळा सुरू झाला की, अनेक आजार उद्भवतात त्यात डासांपासून होणारे अनेक आजार म्हणजे डेंगू, मलेरिया, चिकन गुणिया यांचे प्रमाण खूप जास्त असते. गेली दहा ते पंधरा वर्षात राज्यात विशेषतः पावसाळा आणि पावसाळा झाल्यानंतर देखील डेंग्यूची साथ येते. डेंग्यूचे 4 प्रकारचे व्हेरियंट असून ते डीईएनव्ही या नावाने ओळखले जातात. त्यात डी 1, डी2, डी3, डी4 असे प्रकार आहेत, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे माहिती देताना

राज्यात आत्तापर्यंत डीईएनव्ही 1 नावाचा व्हेरियंट सापडायचा. यात ताप येणे, हातापायाची हाडे दुखणे आणि डोळ्यांच्या मागे डोकं दुखणे अशा पद्धतीची लक्षणे असत. परंतु या वर्षी डी 1 बरोबर डी2 चे देखील विषाणू सापडले आहेत. यात लक्षणे तीच असली तरी प्लेटलेट्सचे प्रमाण खूप वेगाने कमी होते. माणसाच्या शरीरात प्लेटलेट्सचे प्रमाण जे दीड लाखाच्या पुढं असतं ते या डी2 विषाणूमुळे 10 हजारापर्यंत खाली येतात आणि त्यामुळे रुग्णाला शरीरात सर्वत्र रक्तस्त्राव होतो. तसेच या विषाणूमुळे त्या रुग्णाचे मूत्रपिंड तसेच यकृतावर देखील परिणाम होऊ शकतो, असे डॉ.अविनाश भोंडवे म्हणाले.

योग्यवेळी तपासणी करावी अन्यथा गंभीर स्वरूप -
डी1 आणि सध्या सापडत असलेल्या डी2 विषाणूमुळे रुग्णांची तब्येत गंभीर होऊ शकते. या विषाणूमुळे सध्यातरी रुग्ण गंभीर स्वरूपात जात नाहीयेत. पण त्या रुग्णाचे प्लेटलेट्स खूपच कमी होतात तेव्हा त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करून प्लेटलेट्स द्याव्या लागतात. मात्र त्यासाठी जेव्हा रुग्णाला थंडी ताप येतो तेव्हा त्या रुग्णाने डेंग्यूची तपासणी करावी. आजही काही जण तापाकडे दुर्लक्ष करतात आणि त्यानंतर मात्र रुग्णाची परिस्थिती ही गंभीर झालेली असते. त्यामुळे परिस्थिती गंभीर होण्याआधीच लवकरात लवकर तपासणी करावी, असे आवाहन भोंडवे यांनी केले.


हे ही वाचा -ड्रग्ज प्रकरण : समीर वानखेडे किल्ला न्यायालयाकडे रवाना; आर्यन खानची पुन्हा वेद्यकीय तपासणी होणार

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा साथीच्या रोगात वाढ -

शहरात कोरोनाचा प्रदुभाव कमी झाला असला तरी साथीच्या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुणे शहरात कधी पाऊस तर कधी ऊन पडत आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी डबके साचले आहे. यामुळे मच्छर वाढले असून सर्दी, खोकला, ताप याचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू, टायफाईड, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराच्या स्वच्छते बरोबरच टेरिस तसेच आजूबाजूच्याही ठिकाणांची स्वच्छता केली पाहिजे, असं आवाहन देखील यावेळी भोंडवे यांनी केले आहे.

हे ही वाचा -बाबू गेनूला इंग्रजांनी चिरडून मारले, तसेच लखीमपूरमध्ये भाजप सरकारचे कृत्य -संजय राऊत

Last Updated : Oct 16, 2021, 12:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details