महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

...म्हणून बूस्टर डोस घ्यावेच लागणार - डॉ. अविनाश भोंडवे

कोरोनाच्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी आपल्याला लसीचा बूस्टर डोस घ्यावे लागणार आहे. अमेरिका, ब्रिटेन तसेच अन्य शहरांमध्ये बूस्टर डोस देण्यात येत आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.

डॉ. अविनाश भोंडवे
डॉ. अविनाश भोंडवे

By

Published : Sep 14, 2021, 6:45 PM IST

Updated : Sep 14, 2021, 7:23 PM IST

पुणे -जगात आज अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण खूप वेगाने सुरु आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या १३ लसी नागरिकांना उपलध झाल्या आहेत. या लसींचे २ डोस झाल्यावर किंवा पूर्ण लसीकरण झाल्यावर ३ डोस म्हणजेच बूस्टर डोस देणात यावे का? याबाबत सर्वत्र चर्चा सुरु आहे. याच मुख्य कारण असे की या लसींमुळे अँटीबॉडीज तयार होतात आणि या न्यूट्रीलाझम अँटीबॉडीजमुळे कोरोना विषाणू शरीरात टिकत नाही आणि कोरोनाचा प्रतिबंधक होत नाही. परंतु या अँटीबॉडीज लस घेतल्यानंतर साधारणतः ६ ते ८ महिन्यांनंतर त्यांचा प्रभाव कमी होतो. ६ ते ८ महिन्यानंतर कोरोनाची सातही चालूच राहणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी आपल्याला लसीचा बूस्टर डोस घ्यावे लागणार आहे. अमेरिका, ब्रिटेन तसेच अन्य शहरांमध्ये बूस्टर डोस देण्यात येत आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.

माहिती देताना डॉ. अविनाश भोंडवे



'डेल्टा विषाणूबाबत लस ६० ते ६५ टक्केच उपयुक्त ठरते'

कोरोनाच्या ज्या लसी उपलब्ध आहेत. या मुळत: सार्स कोविड २ या विषाणूच्या वापराने ते बनल्या आहेत. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कोरोना विषाणू विरुद्ध ७५ टक्क्यांपासून ते ९५ टक्क्यांपर्यंत प्रतिबंध देतात. परंतु गेल्या काही महिन्यापासून विविध प्रकारचे व्हेरिएंट हे निघाले आहे. या व्हेरिएंट पैकी डेल्टा व्हेरिएंट आहे. हा जगातील १२० देशात पसरला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कोरोनाच्या दुसऱ्या, तिसऱ्या लाटा आल्या आहेत आणि डेल्टा विषाणूला कोरोनाची लस पूर्णपणे प्रतिबंधक करू शकत नाही. या लसीमुळे निर्माण होणारे अँटीबॉडीज डेल्टा विषाणूबाबत केवळ ६० ते ६५ टक्केच उपयुक्त ठरतात. हे लक्षात आल्यांनतर आज या विषाणूसाठी तिसरा डोस देण्यात यावा, हा विचार पुढे येत आहे, असे देखील भोंडवे यांनी यावेळी सांगितले.

'यापुढे कदाचित वर्षभरात एक बूस्टर डोस घ्यावे लागणार'

यापुढे असे काही नवीन व्हेरिएंट निघतेत की ते या लसींना मुळीच दाद देणार नाही. अशा वेळेला या नवीन विषाणूला डोळ्यासमोर ठेवून नव्याने लस तयार कराव्या लागणार आहे. यालाच बूस्टर डोस म्हणतात. जगातील ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या लसी आहे. त्याच्या बूस्टर डोस आपण देतच असतो. त्याचप्रमाणे आपल्याला बूस्टर डोस घ्यावे लागेल. कदाचित वर्षभरात एक बूस्टर डोस घ्यावे लागणार आहे, असे देखील भोंडवे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा -मुंबईत क्लिनअप मार्शलला नागरिकांची मारहाण; मास्क लावण्यावरून उद्भवला वाद

Last Updated : Sep 14, 2021, 7:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details