महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

...तरच लस ६ महिन्यांपर्यंत टिकू शकते - डॉ. अविनाश भोंडवे - लस ६ महिन्यांपर्यंत टिकू शकते

आदर्श तापमान म्हणून या लसींना २ अंश ते ८ अंश डिग्री सेल्सियस इतका आहे. याच तापमानात या दोन्ही लसी ठेवाव्या लागतात. साधारणतः आपल्याकडील कुठल्याही रेफ्रिजरेटरचा हा तापमान असतो. २ अंश ते ८ अंश डिग्री सेल्सियसमध्ये जर या लसी ठेवल्यात तर त्यांचा परिणाम ६ महिन्यांपर्यंत असतो.

डॉ.अविनाश भोंडवे
डॉ.अविनाश भोंडवे

By

Published : Aug 3, 2021, 7:31 PM IST

Updated : Aug 3, 2021, 7:51 PM IST

पुणे - कोविड 19 ची जागतिक साथ आटोक्यात आणण्यासाठी भारतासह जगातल्या अनेक देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. ही जागतिक साथ आटोक्यात आणण्यामध्ये लशींची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. भारतात सध्या कोव्हिशील्ड आणि को-व्हॅक्सिन या दोन लस दिल्या जात आहे. त्यासाठी आदर्श तापमान म्हणून या लसींना २ अंश ते ८ अंश डिग्री सेल्सियस इतका आहे. याच तापमानात या दोन्ही लसी ठेवाव्या लागतात. साधारणतः आपल्याकडील कुठल्याही रेफ्रिजरेटरचा हा तापमान असतो. २ अंश ते ८ अंश डिग्री सेल्सियसमध्ये जर या लसी ठेवल्यात तर त्यांचा परिणाम ६ महिन्यांपर्यंत असतो. ज्यावेळेला लस द्यायची असते तेव्हा त्यावरील व्हायल काढली जाते. एका व्हायलमध्ये १० इंजेक्शन होतात म्हणजेच १० लोकांना एका व्हायलमधून लस देता येते आणि विशेष म्हणजे एकदा व्हायल काढले की ते एका तासात संपवावी लागते, नाहीतर वातावरणाच्या तापमानामुळे ही व्हॅक्सिन नष्ट होऊ शकते, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.

डॉ.अविनाश भोंडवे यांची प्रतिक्रिया
भारतात लसीबाबत अशा पद्धतीने घेतली जाते काळजी

लसीकरणाच्या केंद्रावर ज्यावेळेला १० लोक जमतात तेव्हाच या लसीच व्हायला काढून लस दिली जाते. पुढचे १० लोक जमले की पुढची व्हायल काढली जाते. अशा पद्धतीने साधारणतः लसीकरण केले जाते. यासाठी भारत सरकारने तयारी केली आहे आणि त्यामध्ये २९ हजार ठिकाणी पॉईंट असून प्रत्येक ठिकाणी अडीच ते तीन कोटी लसी साठवल्या जातील, अशी तयारी देखील करण्यात आलेली आहे. भारतात २४० ठिकाणी व्हॉकिंग कुलर, ७० व्हॉकिंग रेफ्रिजरेटर, ४५ हजार बर्फाने केलेले रेफ्रिजरेटर आणि ४१ हजार डिप फ्रिजर, ३०० सोलर रेफ्रिजरेटर हे वापरले जातात. भारतात अनेक ठिकाणी वीज जाते म्हणून सोलर रेफ्रिजेटर वापरले जातात. जिथे लस तयार केली जाते तेथून २ अंश ते ८ अंश डिग्री सेल्सियस असलेल्या खास ट्रकमधून या लसी पाठवल्या जातात. तसेच दुर्गम भागातही आईस पेठ्यांमध्ये पाठवल्या जातात. असेही यावेळी भोंडवे यांनी सांगितले.

'सध्यातरी भारतात योग्य कोल्ड चैन'

जास्त वेळ या तापमानापासून आपण जर या लसी उघड्या ठेवल्या तर त्याचा परिणाम होत नाही. पण भारतात सध्यातरी ही कोल्डचेन योग्यरीत्या वापरली जात आहे. म्हणून कोणत्याही प्रकारे लसी या अद्याप तरी हवामानाच्या किंवा या तापमानवाढीमुळे खराब झालेले नाही, असेही यावेळी भोंडवे यांनी सांगितले.

आईस बॅग अशा केल्या जातात कंडिशनिंग -

एका वॅक्सीन कॅरियरमध्ये चार आईस बॅग असतात. या आईस बॅग वजा १५ ते २५ डिग्रीमध्ये ठेवून डिफ्रीज केल्या जातात. लसीकरण कॅम्पला जाताना या बॅग कंडिशनिंग केल्या जातात. कंडिशनिंग करताना या आईस बॅग फ्रिजरमधून काढून पाण्याचे थेंब तयार होतात आणि बर्फ वितळण्याचा आवाज होतो. तेव्हा ती बॅग वापरण्यास तयार झाली आहे, असे समजले जाते. त्या बॅगवरील पाणी कपड्याने पुसून वॅक्सीन कॅरियरमध्ये ठेवली जाते. आईस बॅगमुळे ६ ते ८ तास लस सुरक्षित राहते. वातावरण योग्य असल्यास १२ तासांपर्यंत लस सुरक्षित राहू शकते, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

तापमान तपासण्यासाठी मॉनिटर स्टिकर -

देशभरात लहान मुलांना पुढील आयुष्यात कोणत्याही प्रकारचे आजार होऊ नयेत म्हणून, लसी दिल्या जातात. कित्तेक वर्ष शोध लावून या लसी बनवण्यात आल्या आहेत. यामुळे पोलिओसह अनेक लसीच्या बॉटलवर एक मॉनिटर स्टिकर लावला जातो. गोल स्टिकरच्या मध्यभागी एक सफेद चौकोन असतो. लसीला जितक्या तापमानात ठेवणे गरजेचे आहे, त्यापेक्षा जास्त तापमान झाल्यास मॉनिटर स्टिकरवरील चौकोनातील रंग गडद होतो. गोलामध्ये असलेल्या रंगापेक्षा चौकोनातील रंग अधिक गडद झाल्यास ती लसची बॉटल खराब झाली, असे समजले जाते. ती बॉटल बायो वेस्टमध्ये टाकली जाते. अशा बॉटलमधील लस लसीकरण करण्यासाठी वापरण्यात येत नाही.

हेही वाचा -मॉनिटर स्टिकरमुळे लस राहते सुरक्षित, मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती

Last Updated : Aug 3, 2021, 7:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details