पुणे -कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अजूनही कोरोना ( Corona ) पूर्णपणे गेला नसून सर्वांनी लसीकरण करून घेणे अनिवार्य आहे. कारण कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन ( Omicron Variant ) हा खूप वेगाने पसरणारा आहे. ज्या लोकांनी कोरोना लस अजूनही घेतली नाही, अशा लोकांना जर ओमायक्रॉन ( Omicron Infection ) झाला तर असे लोक कोरोना स्प्रेडर ( Corona Spreader ) होऊ शकतात. त्यामुळे ज्यांनी दोन्ही लस घेतले आहेत. त्यांना ओमायक्रॉनचा धोका कमी आहे. शिवाय फेब्रुवारीपासून संसर्गाची तिव्रता वाढू शकते, अशी माहिती डॉ. अविनाश भोंडवे ( Dr. Avinash Bhondwe ) यांनी दिली आहे.
डॉ. अविनाश भोंडवे यांची प्रतिक्रिया '...तर तिव्रता वाढू शकते'
ओमायक्रॉनचा धोका लहान मुलांना मोठ्या प्रमाणात आहे. कारण अजूनही लहान मुलांसाठी कोणतीही लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदींनी 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू केले आहे. त्यासाठी कोव्हॅक्सीन लस दिली जाणार आहे. परंतु आता नव्याने ज्या लस उपलब्ध होणार आहेत. त्या DNA प्रकारच्या लस असतील ज्या त्वचेखाली किंवा नाकावाटे दिल्या जातील, अशा प्रकारची लस ही एकदाच घ्यावी लागेल, असेही डॉ. भोंडवे म्हणाले. शिवाय या लसीमुळे ताप येणे, दंड दुखणे असे प्रकार होणार नाहीत. अशा लस आता लवकरच येतील. मात्र 1 ते 15 वयोगटातील मुलांसाठी जर पाहिलं तर त्यांच्यासाठी कोरोना लस अद्याप तयार झाली नाही. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. 15 डिसेंबरपासून तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही. मात्र याची तीव्रता फेब्रुवारीपासून जास्त होवू शकते, अशी शक्यताही डॉ. अविनाश भोंडवे यांनी वर्तवली आहे.
हेही वाचा -Omicron Testing Kit : ओमीक्रॉनच्या निदानासाठी टाटा मेडिकलने तयार केली टेस्टिंग किट; ICMR ची मान्यता