महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Dr. Avinash Bhondwe Pune : 'माणसाला दररोज 6 ते 8 तास झोप आवश्यक' - झोप घेणे आवश्यक

प्रत्येकाला झोपेची गरज ही वेगवेगळी असू शकते, परंतु 6 ते 8 तास झोप ही माणसाला आवश्यक आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.

डॉ. अविनाश भोंडवे
डॉ. अविनाश भोंडवे

By

Published : Mar 23, 2022, 3:57 PM IST

Updated : Mar 23, 2022, 4:05 PM IST

पुणे -सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आरोग्य चांगला राहण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. समतोल आहार, नियमित व्यायाम आणि तिसरे महत्त्वाचे म्हणजे रोजची नियमित झोप. आरोग्य चांगले राहण्यासाठी झोप ही खूप आवश्यक असते. प्रत्येकाला झोपेची गरज ही वेगवेगळी असू शकते, परंतु 6 ते 8 तास झोप ही माणसाला आवश्यक आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया देताना डॉ. अविनाश भोंडवे
झोप म्हणजे काय? -शरीराच्या इतर क्रियांप्रमाणेच झोप ही क्रिया आहे. मानेच्या भागातील पेशींमध्ये झोपेचे संकेत निर्माण होतात. तेथून मज्जारज्जूद्वारे शरीरातील सर्व अवयवांना मंदावण्याचे संकेत जातात. मेंदूच्या इतर भागांनाही हे संकेत जातात. त्यानंतर झोपेचा पहिला प्रकार म्हणजे ‘स्लो वेव स्लीप’ची सुरुवात होते. साधारण तासाभराने दुसरा प्रकार सुरू होतो. यामध्ये डोळ्यांची बुब्बुळे हलतात म्हणून त्याला ‘रॅपिड आय मूव्हमेंट’ किंवा ‘आरईएम’ म्हणतात. या दरम्यान मांसपेशीतील ताण वाढतो आणि शरीराच्या काही हालचाली होतात. या झोपेच्या टप्प्यात शरीर आणि अवयव नेहमीपेक्षा जास्त उत्तेजित होतात. हा टप्पा मेंदूच्या आरामासाठी महत्त्वाचा असतो. रात्रभर हे दोन प्रकार आलटून-पालटून घडतात. स्लो वेवचा कालावधी कमी होत जातो आणि आरईएमचा वाढत जातो.

झोपेचा त्रास म्हणजे काय ? -झोप चांगली येते की नाही हे फक्त संबंधित व्यक्तीच सांगू शकते. व्यक्ती पलंगावर डोळे मिटून पडलेली असते म्हणून त्यांना झोपेच्या तक्रारी नसतात, असे नाही. झोपेच्या त्रासाची अनेक कारणे असतात. बहुतेक वेळेला झोप कशी असावी व ती कशी सांभाळावी हे माहिती नसल्याने झोपेच्या तक्रारी निर्माण होतात. झोपेच्या तक्रारींचे दुसरे मोठे कारण म्हणजे मेंदूचे आणि मानसिक आजार, शारीरिक आजार आणि परिसरातील गोंधळ. यामुळे लहान मुलांनाही झोपेच्या तक्रारी उद्भवतात. शरीरासाठी नियमित आरामदायी झोप अत्यावश्यक आहे. झोपल्यावर शरीराच्या सर्व क्रिया मंदावतात, अवयवांना आराम मिळतो आणि त्यांची दुरुस्तीदेखील होते. नीट झोप झाली नाही तर चिडचिडेपणा, थकवा, अंगदुखीसारखा त्रास होतो. या स्थितीत व्यक्तींची एकाग्रता, चपळता आणि विचारशक्ती कमी झाल्यामुळे त्यांच्या कामात चुका होतात आणि अपघातही घडू शकतात. सततच्या अनियमित झोपेमुळे मेंदूचे आणि मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते. लहान मुलांमध्ये झोप नीट न झाल्यामुळे चंचलपणा, बुद्धीचा खुरटलेला विकास आणि वागणुकीतले त्रास निर्माण होतात.

हेही वाचा -New Corona Variant : डेल्टा आणि ओमायक्रॉनपासून बनलेला नव्या व्हायरसची एन्ट्री!

Last Updated : Mar 23, 2022, 4:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details