महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बुधवार पेठेत डबल मर्डर..! तडीपार गुंडाकडून पोलीस कर्मचाऱ्याचा खून - बुधवार पेठ

पुणे येथील बुधवार पेठेत तडीपार गुंडाने पोलीस कर्मचाऱ्याचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला. या खुनाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असतानाच तेथूनच काही अंतरावर वेश्या व्यवसाय करणाऱ्या आणखी एका महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले. या दोन्ही घटना फरासखाना पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर घडल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Double murder in buthavar Peth
बुधवार पेठेत डबल मर्डर

By

Published : May 5, 2021, 9:00 AM IST

Updated : May 5, 2021, 7:32 PM IST

पुणे - बुधवार पेठेत तडीपार गुंडाने पोलीस कर्मचाऱ्याचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला. या खुनाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असतानाच तेथूनच काही अंतरावर वेश्या व्यवसाय करणाऱ्या आणखी एका महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले. या दोन्ही घटना फरासखाना पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर घडल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे

हेही वाचा -आता मराठा समाजाने आर्थिक निकषावरील आरक्षणासाठी पाठपुरावा करावा - ब्राम्हण महासंघ

पोलीस हवालदार समीर सय्यद (वय 48) असे खून झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार गुंड प्रवीण महाजन याने हा खून केला आहे. फरासखाना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या घटनेत राणी (वय 24) या वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलेचा खून झाला आहे. या महिलेचे पूर्ण नाव अद्याप समोर आले नाही. तिचा खून कोणी आणि का केला हे देखील अद्याप अस्पष्ट आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, प्रवीण महाजन हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी स्वरूपाच्या पार्श्वभूमीमुळे त्याला मागील वर्षी पुणे शहर आणि जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र तडीपारी आदेशाचा भंग करत तो पुणे शहरात आला होता. बुधवार पेठेतील श्री कृष्णा टॉकीज जवळ त्याने मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस कर्मचारी समीर सय्यद यांचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला. खून झाल्याची माहिती मिळताच फरासखाना पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळावरून प्रवीण महाजन याला ताब्यात घेतले. खून नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले आहे.

वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी बुधवार पेठेतील घटनास्थळावर हजर असताना तेथूनच काही अंतरावर आणखी एका महिलेचा खून झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली असता देहविक्री करणारी महिला राणी (वय 24) हिचा अज्ञात व्यक्तीने खून केला होता. हा खून कोणी आणि कशासाठी केला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. फरासखाना पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा -पुणे ग्रामीणमध्ये कोरोना फोफावतोय; चिंताजनक परिस्थिती

Last Updated : May 5, 2021, 7:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details