महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सॅनिटायझेशन टनेलला शास्त्रीय आधार नाही, त्याचा वापर करू नये - आरोग्य विभागाच्या सूचना - corona virus

सॅनिटायझेशन टनेलला शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे त्याचा वापर करू नये, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

corona
corona

By

Published : Apr 21, 2020, 10:29 AM IST

पुणे - सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सॅनिटायझेशन डोम, टनेलचा वापर होत आहे. या डोम टनेलद्वारे व्यक्तींच्या समुहाच्या अंगावर डिसइन्फेक्टेंट रसायनांची फवारणी करण्यात येते. तथापि, सदर सॅनिटेशन डोम टनेलला कोणताही शास्त्रीय आधार नाही. अनेकदा ही रसायने व्यक्तीला अपायकारक देखील ठरू शकतात. त्यामुळे व्यक्ती समुहावर डिसइन्फेक्टेंट रसायनांची फवारणी करणारी सॅनिटेशन डोम टनेल अथवा त्यासदृश यंत्रणांचा वापर करण्यात येऊ नये, असे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत.

केंद्रांच्या या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालयांना राज्याच्या आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांनी दिल्या आहेत. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर काही ठिकाणी अशा प्रकारचे सॅनिटायझेशन टनेल उभारण्यात येत होते. विविध सामाजिक संस्थांकडून अशा प्रकारच्या या टनेलची उभारणी केली जात होती. मात्र, यामुळे सॅनिटेशन होत याला कुठलाही शास्त्रीय आधार नसल्याचे आरोग्य विभागाकडून कळवण्यात आले आहे. तसेच त्याचा वापर केला जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details