महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाबाबत पालिकेच्या उपाययोजना; अफवांवर विश्वास ठेऊ नये, आयुक्तांचे आवाहन - corona today news

पुणे महापालिकेच्‍या नायडू रुग्णालयात आवश्‍यक ती खबरदारी घेण्‍यात आली आहे. आतापर्यंत 81 रुग्‍णांनी तपासणी करण्यात आली असून यात एकाही रुग्‍णाला कोरोनाची बाधा झालेली नाही.

naidu hospital pune
नायडू रुग्णालय

By

Published : Mar 5, 2020, 8:16 PM IST

पुणे- चीनमधील कोरोना विषाणूबाबत माहिती मिळाल्‍यानंतर 20 जानेवारीपासून पुणे महापालिकेच्‍या नायडू रुग्णालयात आवश्‍यक ती खबरदारी घेण्‍यात आली आहे. आतापर्यंत 81 रुग्‍णांनी तपासणी करण्यात आली असून यात एकाही रुग्‍णाला कोरोनाची बाधा झाली नाही, अशी माहिती महापालिका आयुक्‍त डॉ. शेखर गायकवाड यांनी दिली. तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

शेखर गायकवाड - पुणे महापालिका आयुक्त

दरम्यान, कोरोना विषाणूबाबत पुणे जिल्‍ह्यातील नागरिक जागरूक आहेत, असे सांगून डॉ. गायकवाड म्‍हणाले, पुणे मनपा प्रशासन दक्ष असून नायडू रुग्णालयाप्रमाणे आणखी 10 रुग्णालयांमध्‍ये अशी सुविधा निर्माण करण्‍यासाठी राज्‍य शासनाला प्रस्‍ताव पाठवला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये, परिसराची स्‍वच्‍छता ठेवावी, गर्दीच्‍या ठिकाणी जाणे टाळावे, खोकला, ताप येत असल्‍यास नायडू रुग्णालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन डॉ. गायकवाड यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details