पुणे :भेटायला माझ्याकडेच वेळ होता. मात्र मला वाटत नाही बाकी कुणाकडे भेटायला वेळ होता, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे. ते पुण्यात बोलत होते. शिवसेनेतील बंडखोरांच्या मतदारसंघात सध्या एकनाथ शिंदेंचे दौरे सुरू आहेत. आमच्याकडे मंत्री पद असताना आम्ही सत्तेतून बाहेर पडलो. मला निवडून यायला कुठलीही निशाणी लागत नाही, एवढे काम मी माझ्या मतदारसंघात केले आहे, असा टोला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका - शिवसैनिकांना या अडीच वर्षात काय मिळाले, तडीपारीची कारवाई करण्यात आली. अडीच वर्षात आम्हाला कुणी विचारले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीशी फारकत करण्याची सामान्य शिवसैनिकांची भावना होती. मात्र, आम्हाल उघड्या डोळ्यांनी हे पाहत बसावे लागत होते, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.