महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Omicron Virus in Maharashtra : 'ओमिक्रॉन'ला घाबरण्याची गरज नाही - डॉ. प्रदीप आवटे

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला कोरोनाच्या नवीन प्रकारात ओमीक्रॉन विषाणू ( Omicron Virus in Maharashtra ) अत्यंत संसर्गजन्य आणि चिंता वाढवणारा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशासह राज्यात देखील खबरदारी घेतली जात आहे. यामुळे घाबरण्याची गरज नाही, असे आरोग्य विभागातील सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Nov 29, 2021, 8:03 PM IST

पुणे -दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला कोरोनाच्या नवीन प्रकारात ओमीक्रॉन विषाणू ( Omicron Virus in Maharashtra ) अत्यंत संसर्गजन्य आणि चिंता वाढवणारा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) सांगितले आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशासह राज्यात देखील खबरदारी घेतली जात आहे. राज्य सरकारच्या वतीने या नवीन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध जाहीर करण्यात आलेले आहे. बी.1.1.529 व्हायरस हा चिंता करणारा व्हायरस आहे. या विषाणूचे वैशिष्ट्य म्हणजे यात 30 पेक्षा जास्त म्युटेशन आहे. डेल्टापेक्षा अतिशय घातक म्हणून या विषाणूकडे पाहिले जात आहे. मात्र, विषाणूला वेळेतच आटोक्यात आणण्यासाठी सर्वेक्षण सुरू असून घाबरण्याची गरज नाही, असे आरोग्य विभागातील सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी म्हटले आहे.

डॉ. प्रदीप आवटे यांच्याशी बातचित करताना प्रतिनिधी
असा केला जातोय सर्वेक्षण

ज्या देशात या नवीन व्हायरसचे रुग्ण सापडत आहे. त्या देशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जात असून कोरोनाग्रस आढळल्यास त्यांची जनुकीय क्रमनिर्धारण चाचणी (Genome Sequencing Test ) केली जात आहे. तसेच त्या देशातील माहिती घेऊन अभ्यास केला जात आहे. त्याच पद्धतीने सर्वेक्षणात जे आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत, त्यांच्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यासही सात दिवस क्वारंटाइन केले जाणार असून आठव्या दिवशी पुन्हा चाचमी केली जाणार आहे. याच्यामागचे उद्दिष्ट हाच की हा विषाणू लवकरात लवकर कळावे, हे उद्दिष्ट असल्याचे आवटे यांनी सांगितले.

हे ही वाचा -Murlidhar Mohol on corona - पुण्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात; शहरातील जम्बो रुग्णालय 31 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार

ABOUT THE AUTHOR

...view details