महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात श्वानाला अमानुष मारहाण; एकावर गुन्हा दाखल - puppy

पुण्याच्या कासारवाडीत आपल्या आईला कुत्रा चावला म्हणून एकाने त्या श्वानाला अमानुषपणे मारहाण केली. यासंबंधी भोसरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कासारवाडीत कुत्र्याला अमानुष मारहाण

By

Published : Jul 31, 2019, 8:22 PM IST


पुणे - आईला कुत्रा चावला म्हणून त्याला अमानुष मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. गळ्यात दोरी बांधून श्वानाला लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी दुपारी कासारवाडी येथे घडली. बसलिंग रामचंद्र घायगुळे (वय-५०) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या घटनेसंबंधी कृष्णा गंगाराम जमादार (वय- २०) यांनी भोसरी पोलीसात तक्रारी दिली आहे.

कासारवाडीत श्वानाला अमानुष मारहाण
मंगळवारी कासारवाडी येथे राहत्या घरात आरोपीच्या आईला श्वानाने चावा घेतला. बसलिंग हे तेव्हा कामावरून घरी आले होते. आईला श्वानाने चावा घेतल्याचे समजताच त्यांनी श्वानाचा शोध घेऊन दररोज पाहण्यात असलेल्या कुत्र्याला दोरीने गळ्याला बांधत लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण केली आहे. यात कुत्रा जखमी झाला आहे. घटनेमुळे प्राणीमित्र हे आक्रमक झाले असून बसलिंगला अटक करावी, अशी मागणी करत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी वाकड परिसरात कुत्रा हॉटेल समोर बसत असल्याचा राग मनात धरून त्याचा चाकूने भोकसून खून केल्याची घटना घडली होती. त्या घटनेसंबंधी वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details