महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मंदिरे उघडल्यानेच कोरोना पसरतो का ? मोरगावमधील महिलांचा सवाल

राज्य सरकारने मंदिरा बाबतही असाच निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा मंदिरावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. मंदिरे बंद असल्यामुळे असंख्य व्यवसायिक भरडले गेले आहेत. व्यवसायिकांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. मंदिरच बंद असल्याने भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागत आहे.

Morgaon
Morgaon

By

Published : Sep 11, 2021, 6:27 PM IST

बारामती - मोरगाव हे अष्टविनायकातील प्रथम स्थान आहे. वर्षभर येथे राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र कोरोनामुळे दीड वर्षांपासून मंदिरे बंद आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांचा शुकशुकाट आहे. कोरोनामुळे भाविकच येत नसल्यामुळे छोटेमोठे व्यवसायिक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. सरकारने आम्हाला योग्य ती मदत करावी अशी अपेक्षा तेथील महिलांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.

मोरगावमधील महिलांचा सवाल
मोठमोठे हॉटेल्स, कंपन्या व इतर उद्योग ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात आले आहेत. मंदिरा बाबतही असाच निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा मंदिरावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. मंदिरे बंद असल्यामुळे असंख्य व्यवसायिक भरडले गेले आहेत. व्यवसायिकांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. मंदिरच बंद असल्याने भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागत आहे. संपूर्ण मोरगावचा आर्थिक गाडा येथील मोरेश्वर मंदिरावर अवलंबून आहे.त्यामुळे लवकरच मंदिरे खुले करण्याची प्रक्रिया सरकारने करावी अशी विनंती व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.भाविकांवरच अवलंबूनगणेश उत्सवाच्या काळात मोरगाव येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. यावेळी मुंबई, -पुणे-नाशिक कोल्हापूरसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून व राज्याबाहेरील अनेक भाविक,भक्त मयुरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येतात. दर्शनाला येणार्‍या भाविकांवरच येथील छोट्या चहाच्या स्टॉल पासून ते हॉटेल, लॉज तसेच हार, फुले व प्रसाद विकणार्‍यांचा व्यवसाय चालत असतो.

सरकारला गांभीर्य नाही
कोरोनामुळे दोन वर्षात आमच्यावर मोठी बेकारीची वेळ आली आहे. सरकारला याचे कसलेही गांभीर्य नाही. मंदिरे बंद असल्यामुळे परिसरात चिक्कू, पेरू, सिताफळ विकून वर्षाकाठी अडीच ते तीन लाख रुपये मिळत होते. यावर्षी फक्त साठ हजार रुपये मिळाले. मागील वर्षी तर एकही रुपया मिळाला नाही. यापेक्षा आणखी दुःख मी सांगू शकत नाही. मंदिरावर अवलंबून असणारे व्यवसायिक जगतील की मरतील याचे कसलेही गांभीर्य सरकारला नसल्याची उद्विग्न प्रतिक्रिया शंकर तावरे यांनी दिली.

मंदिरे उघडल्यानेच कोरोना पसरतो का
मंदिर बंद असल्यामुळे माझा फुलांचा व कटलरी व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. मंदिर बंद असले तरी आम्हाला लाईटबिल, गाळे भाडे द्यावेच लागते. सर्वत्र सभा आंदोलने सुरू आहेत. तिथं कोरोना पसरत नाही का.. मंदिरातच कोरोना पसरतोय का.. मंदिरात शासकीय नियमांचे पालन केले जाते. आम्ही त्याचे पालन करत असतो.बाकी सर्व खुले असताना मंदिरही उघडली जावीत अशी अपेक्षा संजीवनी केदारी, सुरेखा केदारी, सिद्धी इनामदार या महिला व्यवसायिकांनी केली आहे.
हेही वाचा -Saki Naka Rape Case: बलात्कार प्रकरणात एकच आरोपी, नराधमाला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details