महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यातील डॉक्टर अन् हॉस्पिटल दोन्ही ऑक्सिजनवर.. पुणे डॉक्टर्स असोसिएशनने मांडली भूमिका - कोरोना संख्या पुणे

पुण्यात सद्यस्थितीमध्ये कोविड-19 आजाराचे व्यवस्थापन करताना ऑक्सिजन, रेमडेसिवीर वितरणाच्या प्रशासकीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या तातडीने दूर व्हाव्यात अशी मागणी पुणे डॉक्टर्स असोसिएशनने केली आहे.

पुण्यातील डॉक्टर अन् हॉस्पिटल दोन्ही ऑक्सिजनवर.
Doctors and hospitals in Pune on both oxygen

By

Published : Apr 30, 2021, 6:51 PM IST

Updated : Apr 30, 2021, 7:08 PM IST

पुणे -पुण्यात सद्यस्थितीमध्ये कोविड-19 आजाराचे व्यवस्थापन करताना ऑक्सिजन, रेमडेसिवीर वितरणाच्या प्रशासकीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या तातडीने दूर व्हाव्यात अशी मागणी पुणे डॉक्टर्स असोसिएशनने केली आहे. पुण्यातील रुग्णालय, सीसीसी सेंटरमध्ये होत असलेल्या अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे पुण्यातील डॉक्टर आणि रुग्णालय हे दोन्ही सध्या ऑक्सिजनवर असल्याचे मत पुणे डॉक्टर्स असोसिएशनने मांडले आहे.

पुणे डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संभाजी मांगडे, विश्वस्त डॉ.सुनील जगताप यांनी ही मागणी केली आहे. यावेळी डॉ.रवींद्र कुमार काटकर, डॉ.नीरज जाधव आदी डॉक्टर्स उपस्थित होते.

पुण्यातील डॉक्टर अन् हॉस्पिटल दोन्ही ऑक्सिजनवर.
अनेक सीसीसी सेंटरमध्ये ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची कमतरता -पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर अनेक कोविड केंद्र सुरू झाली आहेत.प्रत्यक्ष कोविडचे रुग्ण तपासात असताना व उपचार देत असताना हॉस्पिटल्स,कोविड केअर सेंटर तसेच वैदयकीय सेवक यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्यामध्ये प्रामुख्याने ऑक्सिजनची कमतरता तसेच रेमिडीसीविरची पुरेशी जपलब्धता नसणे ही अडचण येत आहे.अनेक रुग्ण हे ऑक्सिजन विना आपले प्राण गमावत आहे.पुणे शहरात प्रशासनाच्या सहकार्याशिवाय सार्वजनिक आरोग्य सेवा संपूर्ण होऊच शकत नाही.या गोष्टी असतील तरच डॉक्टर्स कोविडच्या रुग्णांना बरे करू शकतात.आम्ही रुग्णांच्या नातेवाईकांना काय उत्तर द्यायचे -शहरात गेल्या 15 दिवसांपासून ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. तसेच रेमडेसिवीरही उपलब्ध होत नाहीये. या स्थितीत खासगी रुग्णालय आणि कोविड रुग्णालयात येणारे रुग्ण हे अत्यवस्थ स्थितीत येतात. त्यांना ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्यास नातेवाईक उपलब्ध बेड वर रुग्णांना अ‌ॅडमिट करून घ्या, असे म्हणतात. अशा रुग्णांना शेवटपर्यंत ऑक्सिजन बेड मिळत नाही व रुग्ण दगावतो. मग आम्ही रुग्णांच्या नातेवाईकांना उत्तर काय द्यावं असा प्रश्न आमच्या समोरे उपस्थित राहतो.प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वेळेवर द्यावी हीच विनंती -सर्व वैद्यकीय सेवकांची प्रशासनाला एकच विनंती आहे की आम्ही रुग्ण वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवावर उदार होण्यास देखील तयार आहोत. परंतु रुग्णांना सेवा पुरवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी अत्यावश्यक आहे त्यांची अडचण येणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. एफडीए कडून इंजेक्शन वितरणाची व्यवस्था जिल्हाधिकारी ऑफिसला जाण्याने अडचण वाढली आहे.अस ही यावेळी संघटनेने सांगितले आहे.
Last Updated : Apr 30, 2021, 7:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details