पुणे - ससून रुग्णालयातील डॉक्टर तसेच अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बी.जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले यांच्या तडकाफडकी करण्यात आलेल्या बदलीवर नाराजी व्यक्त केली आहे. यासाठी सर्वांनी कॉलेजच्या आवारात एकत्र येऊन निषेध नोंदवला.
बी.जे. मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातांच्या बदलीवर डॉक्टरांची नाराजी; विभागीय आयुक्तांना भेटणार - pune agitation news
ससून रुग्णालयातील डॉक्टर तसेच अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बी.जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले यांच्या तडकाफडकी करण्यात आलेल्या बदलीवर नाराजी व्यक्त केली आहे. यासाठी सर्वांनी कॉलेजच्या आवारात एकत्र येऊन निषेध नोंदवला.

डॉ. चंदनवाले यांना तातडीने अधिष्ठाता पदाचा कार्यभार सोडण्याचे आदेश मिळाले होते. त्यानुसार चंदनवाले यांनी आज बी. जे. रुग्णालयाचा निरोप घेतला. यावेळी उपस्थित वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित बदलीप्रकरणी निवासी डॉक्टर्स विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी भेटणार असल्याची माहिती मिळत आहे. अखेर तणावाच्या वातावरणात डॉ. चंदनवाले यांनी निरोप घेतला. या प्रकारानंतर पोलिसांनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
शहरात कोरोनाचे वाढते सावट असताना उच्च पदावरील डॉक्टरांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने काही कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. तसेच पुण्यतील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढत असताना सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा निषेध ससून रुग्णालयात तसेच बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये करण्यात येत आहे.