पुणे -भारतीय कुस्तीगीर संघटनेकडून महाराष्ट्रातील कुस्तीगीर परिषद बरखास्त केली ( Maharashtra Kusti Parishad Dismissal ) आहे. या परिषदेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे असून, राज्याच्या दृष्टीने मल्लांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यावर आता शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. क्रीडा क्षेत्रात अनेक राजकीय लोक आहे. पण, कधीही राजकीय दृष्टीने बघितलं नाही. तसेच, राज्यात सुरु असलेल्या राजकारणाशी या बरखास्तीचा काहीही संबंध नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ( Sharad Pawar On Maharashtra Kusti Parishad ) होते.
"ब्रिजभूषण सिंह यांची भेट घेणार" - शरद पवार म्हणाले की, राज्यात अनेक खेळाच्या संस्था आहेत. मी अनेक वर्षापासून अध्यक्ष आहे. मी क्रिकेटचा अध्यक्ष होतो. देशाचा, मुंबईचा आणि जगाचाही होतो. खेळाच्या संघटनेत खेळाडू निवडीत मी लक्ष घालत नाही. त्या क्षेत्रातील जाणकारांनी काम पाहावे हे मी करत होतो. त्यांना जर काही अडचणी आल्या किंवा शासकीय मदतची गरज भासली तर मी मदत करायचो. क्रीडा शेत्रात अनेक राजकीय लोक आहे. पण, कधीही राजकीय दृष्टीने बघितलं नाही. राज्यात सुरु असलेल्या राजकारणाशी या बरखास्तीचा काहीही संबंध नाही. तसेच, याबाबत दिल्लीवर गेल्यावर परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांची भेट घेणार असल्याचं यावेळी पवार यांनी सांगितलं आहे.