महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सिग्नलवर वस्तू विकणाऱ्या बालकांसोबत दिवाळी, आबा बागुल मित्र परिवाराचा अनोखा उपक्रम - आबा बागुल मित्र परिवाराकडून बालकांना कपड्यांचे वाटप, पुणे

पुण्यात आबा बागुल मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी सिग्नलवर वस्तू विकणाऱ्या बालगोपाळांसोबत दिवाळी साजरी केली जाते. यंदा दिवाळीनिमित्त शंकरशेट रोडवर वस्तू विकणाऱ्या बालकांना कपडे व फराळाचे वाटप करण्यात आले.

Diwali with children selling goods on signals
सिग्नलवर वस्तू विकणाऱ्या बालकांसोबत दिवाळी

By

Published : Nov 14, 2020, 3:29 PM IST

पुणे -पुण्यात आबा बागुल मित्र परिवाराच्यावतीने दरवर्षी सिग्नलवर वस्तू विकणाऱ्या बालगोपाळांसोबत दिवाळी साजरी केली जाते. हे या अनोख्या उपक्रमाचे 9 वे वर्ष आहे. यंदा शहरातील शंकरशेट रोडवर वस्तू विकणाऱ्या बालकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. दिवाळीनिमित्त या बालकांना भेटवस्तू आणि फराळाचे वाटप करण्यात आले.

सिग्नलवर वस्तू विकणाऱ्या बालकांसोबत दिवाळी

आपल्या प्रमाणाचे या मुलांची दिवाळी देखील आनंदात जावी, काही काळ का होत नाहीत पण सुखाचे क्षण त्यांच्या वाट्याला यावेत. या हेतून मुलांसोबत ही दिवाळी साजरी करण्यात येते. दिवाळीनिमित्त या मुलांना औक्षण करून अभ्यंगस्नान घातले जाते. त्यानंतर या मुलांना कपडे, विविध भेटवस्तू व फराळाचे वाटप होते. मात्र यंदा कोरोनामुळे या मुलांना अभ्यंगस्नान न घालता, दिवाळी साहित्य आणि त्यांच्या कुटुंबाला किराणा किट देऊन ही दिवाळी साजरी करण्यात आली. अशी माहिती पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल यांनी दिली. दरम्यान आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आहे. त्यांची जयंती सर्वत्र बालदिन म्हणून साजरा केली जाते. आबा बागुल मित्र परिवाराच्या वतीने हा बालदिन विशेष मुलांसोबत साजरा करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details