पुणे -भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रातील काही भागात दिवाळी सुरु होते ती 'वसु-बारस' या दिवसापासून. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो.
या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत -
हिंदू धर्मात गाईला महत्त्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची तिच्या वासरासह पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे, या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्सद्वादशी असेही म्हणतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते.