पुणे - दिवाळी जवळ आली की छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांचा पराक्रम तसे संघर्षातून उभे राहिलेले गडकोट साकारण्यासाठी बच्चे कंपनीची लगबग सुरू होते. गेल्या काही वर्षात गड कोटासाठी लागणारे माती दगड विटा कधी साहित्य सहज उपलब्ध होत असल्याने चिमुकल्यांच्या पालकांचा ओढा किल्ल्यांचे तयार प्रतिकृती खरेदीकडे वाढत आहे. त्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पश्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोणालाच उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली नाही. पण यंदा कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल झाल्याने बाजारात विविध किल्ह्यांसह मावळे तसेच विविध वस्तू खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. बाजारपेठ ग्राहकांनी फुलले असल्याने यंदाची ही दिवाळी ही गोड होणार असल्याच यावेळी व्यापारी ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे. याबाबद आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी-
दिवाळीचे साहित्य बाजारात दाखल
दिवाळीजवळ आली की माती आणण्यापासून किल्ल्यांसाठी जागा निवडणे त्याचा आकार ठरवणे वेगवेगळ्या किल्ल्यांची माहिती गोळा करून त्याचा इतिहास जाणून घेणे व त्यांनंतर योग्य किल्ला तयार करणे असे बच्चे कंपनीचे नियोजन सुरू होत होते. मात्र, वाढत्या शहरीकरणानंतर फ्लॅट संस्कृती तसेच किल्ल्यांसाठी लागणारी माती, दगड विटा आदी गोष्ट सहज उपलब्ध होत नसल्याने तयार किल्ले खरेदी करण्याकडे पालकांचा कल वाढत आहे. पुण्यातील कुंभार वाडा येथे सद्यस्थितीत बाजारात 12 इंचापासून ते तीन फुटांपर्यंत किल्ले दाखल झाले आहेत. त्याच पद्धतीने विविध पोशाखात मावळे, हत्ती, घोडे त्याच पद्धतीने विविध आकारात बनवलेले पणत्या खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत.