पुणे - भारतीय फराळाला विदेशात शिक्षण, व्यवसाय, नोकरीनिमित्त परदेशात राहणारे किंवा स्थायिक झालेली दिवाळीला मागवीत असतात. गेल्या वर्षी कोरोनामुळे फराळाची मागणी घटली होती. मात्र, यंदा घरगुती महिला उद्योजकांची यंदाची दिवाळी गोड झाली आहे. या दिवाळीत सुमारे सत्तर हजार महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. केवळ शहरातच नव्हे, तर परदेशातही या महिलांनी तब्बल साडेतीन टन फराळ पाठविला आहे.
फॉरेनला निघाला दिवाळीचा फराळ; यंदा परदेशात मागणी वाढल्याने घरगुती फराळाला अच्छे दिन - दिवाळी फराळ
गेल्या वर्षी कोरोनामुळे फराळाची मागणी घटली होती. मात्र, यंदा घरगुती महिला उद्योजकांची यंदाची दिवाळी गोड झाली आहे. या दिवाळीत सुमारे सत्तर हजार महिलांच्या हाताला काम मिळाले आहे.
यंदा घरगुती महिला उद्योजकांची यंदाची दिवाळी गोड
दिवाळीच्या रेडीमेड फराळाला मागणी वाढली असली, तरी कच्चा मालाच्या वाढलेल्या किमती, तेलाचे वाढलेले भाव, मजुरी आणि मटेरियल पॅकिंगचा वाढता खर्च यामुळे यावर्षी दिवाळी फराळाच्या किमतीमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
प्रति किलो फराळांचे दर -
मोतीचूर लाडू (साधा) 400, मोतीचूर लाडू (साजूक तूपातील) 520 , बेसन लाडू 450 , पोहे चिवडा 350 , चकली 450 , शंकरपाळे 300 , अनारसे 650 असा दर आहे.