पुणे- येथील भारती रुग्णालयामधील कोरोना उपाययोजनांसंदर्भात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची तसेच पॉझिटिव्ह रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी पाहणी करुन रुग्णालयातील तयारीचा आढावा घेतला.
विभागीय आयुक्तांनी घेतला भारती रुग्णालयात कोरोना उपाययोजनांचा आढावा - pune corona latest news
विभागीय आयुक्तांनी भारती रुग्णालयात कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला आहे.

विभागीय आयुक्तांनी घेतला भारती रुग्णालयात कोरोना उपाययोजनांचा आढावा
डॉ. म्हैसेकर यांनी रुग्णालयातील उपलब्ध साधनसामुग्रीचा आढावा घेतला. तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या अडचणींसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. रुग्णालयातील एकूण क्षमता,आयसीयूमध्ये असलेल्या सोई सुविधा या तयारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.