महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 11, 2019, 6:37 PM IST

Updated : Aug 11, 2019, 7:36 PM IST

ETV Bharat / city

पश्चिम महाराष्ट्रातील महापुरात आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू, ३ तीन बेपत्ता

पुरामुळे पुणे विभागात आत्तापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे.  ब्रम्हनाळ दुर्घटनेतील मृतांची संख्या १७ झाली आहे. आज ५ पाच मृतदेह सापडले आहेत. सांगलीतील  ६७ रस्ते बंद आहेत, तर ३७ पूल पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ८७ रस्ते बंद आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

सांगली कोल्हापूरातील माहपूराची सद्यस्थिती

पुणे - सांगली आणि कोल्हापुरातील महापुराचे पाणी वेगाने कमी होत आहे. सांगलीत शनिवारी कृष्णेच्या पाण्याची पातळी ५६ फूट तर कोल्हापुरात पंचगंगेच्या पाण्याची पातळी ५१.१० फूट होती. आज कष्णेच्या पाण्याची पातळी 53 फुट तर पंचगंगेच्या पाण्याची पातळी ४९.१८ फुट आहे, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

महापुरात आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू, ३ तीन बेपत्ता
  • स्थलांतरीत व्यक्ती - 4, 41, 845
  • सांगली - 1, 58, 970
  • कोल्हापूर - 2, 45, 229
  • सातारा - 10, 486
  • सोलापूर - 29, 999

मृत व्यक्ती -

कोल्हापूर - 6 मृत १ बेपत्ता

सांगलीत- 19 मृत १ बेपत्ता

सातारा - 7 मृत 1 बेपत्ता

पुरामुळे पुणे विभागात आत्तापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रम्हनाळ दुर्घटनेतील मृतांची संख्या १७ झाली आहे. आज ५ पाच जणांचे मृतदेह नव्याने सापडले आहेत. सांगलीतील ६७ रस्ते बंद आहेत, तर ३७ पूल पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ८७ रस्ते बंद आहेत. सर्व पूरग्रस्तांना केल्या जाणाऱ्या मदतीपैकी ५ हजार रोख स्वरुपात दिले जातील आणि उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा केले जाईल. मंगळवारपासून या रक्कमेचे वाटप केले जाईल, अशी माहितीही आयुक्तांनी दिली.

सांगली कोल्हापुरात चलन तुटवडा निर्माण होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. कोणत्याही खातेदाराला पैसे काढण्यास अडचण निर्माण होणार नाही. बँकेने पासबुक अथवा चेकचा आग्रह धरू नये यासंबधीत सूचना देण्यात आल्या आहेत. पैसे वाटपात पोलीस मदत लागली तर ती पुरवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महामार्गावरील ५४००० वाहनांना दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आले आहे. सध्या ४००० वाहने आजूनही रस्त्यावर ऊभी आहेत. सांगली, मीरजचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूरसाठी विद्यापीठातील पाणिपुरवठा करण्यातस सुरुवात केली आहे. पुणे महापाकेचे १०४ तर पिंपरी चिंचवड महापालिकेचे जवळपास १०० कर्मचारी मदत कर्यासाठी कोल्हापूर सांगलीकडे रवाना झाले आहेत. या दोन्ही भागातील स्वच्छतेसाठी टेंडर काढण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Last Updated : Aug 11, 2019, 7:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details