महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shiv Jayanti 2022 : मुस्लिम धर्मियांतर्फे शिवजयंतीनिमित्त खीर आणि सरबतचे वाटप.. - छत्रपती शिवाजी महाराज

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यात मुस्लिम बांधवांतर्फे अनोखा उपक्रम राबविण्यात ( Shiv Jayanti Initiative By Muslim Community In Pune ) आला. मुस्लिम बांधवांनी एकात्मतेचा संदेश देत शिवजयंतीनिमित्त ( Shiv Jayanti 2022 ) खीर आणि सरबतचे वाटप केले.

मुस्लिम धर्मियांतर्फे शिवजयंतीनिमित्त खीर आणि सरबतचे वाटप..
मुस्लिम धर्मियांतर्फे शिवजयंतीनिमित्त खीर आणि सरबतचे वाटप..

By

Published : Feb 19, 2022, 10:54 PM IST

पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वधर्मीय मोठ्या उत्साहाने साजरी करतात. पुण्यातही एकात्मतेचा संदेश देत मोमीनपुरा येथील राजे सुलतान फ्रेंड्स सर्कलच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली ( Shiv Jayanti Initiative By Muslim Community In Pune ) जाते. यंदाही शिवजयंतीच्यानिमित्ताने ( Shiv Jayanti 2022 ) खीर आणि सरबतचे वाटप करण्यात आले आहे.

मुस्लिम धर्मियांतर्फे शिवजयंतीनिमित्त खीर आणि सरबतचे वाटप..

दरवर्षी राबवितात उपक्रम

दरवर्षी या राजे सुलतान फ्रेंड्स सर्कल संस्थापक तौसिफ चिंधीवाला, अध्यक्ष जावेद खान यांच्यावतीने शिवजयंती निमित्ताने विविध स्पर्धा, व्याख्यान, तसेच समाजप्रबोधन पर कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात, अशी माहिती यावेळी सामाजिक कार्यकर्ते खिसाल जाफरी यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details