महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

काँग्रेसच्या छत्री दुरुस्ती उपक्रमात 'भाजपची छत्री' दुरुस्तीसाठी आल्याने सोशल मीडियात चर्चा

पुणे शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे मोफत छत्री दुरुस्ती उपक्रमाचे आयोजन केले आहे. काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या पुढाकारातून उपक्रमाला सुरुवात झाली. काँग्रेसच्या या उपक्रमाला सर्वसामान्य पुणेकरांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे.

umbrella repair initiative
umbrella repair initiative

By

Published : Jun 18, 2021, 3:35 PM IST

पुणे - पुणे शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे मोफत छत्री दुरुस्ती उपक्रमाचे आयोजन केले आहे. काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या पुढाकारातून उपक्रमाला सुरुवात झाली. काँग्रेसच्या या उपक्रमाला सर्वसामान्य पुणेकरांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. सोमवारपासून सुरू असलेल्या या उपक्रमात आतापर्यंत चारशेहून अधिक छत्र्या दुरुस्त करण्यात आल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. परंतु असे असले तरी काँग्रेसच्या या छत्री दुरुस्ती उपक्रमाची सोशल मीडियावर मात्र खिल्ली उडवली जात आहे.

दरम्यान काँग्रेसच्या या उपक्रमात भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांची नावे असलेली छत्री दुरुस्त करण्यासाठी एक नागरिक घेऊन आला. भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याचा रंग आणि पक्षाचं चिन्ह असलेली ही छत्री दुरुस्त करण्यासाठी एका वयोवृद्ध व्यक्तीने याठिकाणी आणून दिली. ही छत्री दुरुस्त करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ही संधी साधून काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी देखील आता या छत्री दुरुस्ती उपक्रमावर ट्विट करत काँग्रेसला टोला लगावला आहे. सध्या दोन चिल्लर पक्षांच्या छताखाली असलेला कॉंग्रेस पक्ष फुटकळ कामांची किती मोठी जाहिरातबाजी करतोय पाहा. या होर्डिंग्जचा किमतीत 50 नव्या छत्र्या आल्या असत्या, असे म्हणत टोला लगावला आहे.

दरम्यान सोशल मीडियात काँग्रेसच्या या छत्री दुरुस्ती उपक्रमाची कितीही खिल्ली उडवली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना हा उपक्रम म्हणजे दिलासा देणारा वाटत आहे. अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details