पुणे - भारतीय परंपरेतील सर्व सण आणि उत्सव हे दाखवण्याचे माध्यम म्हणजे ढोल- ताशा पथक पुण्यातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहे. त्याच गणेशोत्सवामध्ये ढोल- ताशा पथकाचे मुख्य आकर्षण असतं आणि हा निनाद ऐकण्यासाठी जगभरातून भक्त पुण्यात येत असतात, पण नेमकं हे ढोल ताशाच पडद्यामागचे कलाकार म्हणजेच ढोल- ताशा बनवणारे व्यावसायिक, नेमकं हे ढोल- ताशा बनतात तरी कसं ? सध्या यांचे स्वरूप कसं बदलत गेलंय..पूर्वी कसं होतं पहा स्पेशल रिपोर्ट
यात्रेमध्ये ढोल वाजवले जायचे - पूर्वीच्या काळी गावातील जत्रा यात्रा असल्या, की ढोल- ताशा वाजवले जायचे. त्यावेळेस गावागावातली पथक पुण्यात येऊन ते ढोल- ताशा खरेदी करायची, असे पुण्यातील व्यावसायिक सांगतात. ढोल- ताशाचे स्वरूप बदलले तसे ढोल- ताशाचा व्यवसायही बदलला. आत्ताचा आणि तेव्हाचा जमीन आसमाचा फरक असल्याचं व्यवसायिक सांगत असतात. पूर्वी जत्रेतच ढोल वाजायचे, पण आता 12 महिने हा ढोल बनवण्याचा व्यवसाय चालत आहे.
चैत्र महिन्यात जास्त ढोलची मागणी असायची -वार आणि परंपरेनुसार महाराष्ट्रामध्ये चैत्र महिनामध्ये अनेक गावच्या जत्रा असायच्या आणि त्यामध्ये सर्व ढोल पथक सहभागी व्हायचे. त्यामुळे चैत्र महिन्यात पुण्याच्या आजूबाजूचे जे गाव आहेत. जे मुख्य ढोल पथक आहेत. ते याच दुकानांमध्ये येऊन राहायचे असे सांगतात.
किरकटवाडी, कोंडवे, धावडे, धायरी अशा पुण्याचं आजूबाजूच्या मावळ या भागांमध्ये ढोल ताशांची पारंपरिक अशी हौस होती. त्यानंतर कालांतराने शहरांमध्ये युवक याकडे वळायला लागला आणि ढोल ताशा व्यवसायालाही एक चांगलं स्वरूप यायला लागलं.
ढोल कसे बनवतात - बकरीच्या चमड्यापासून हे ढोल बनवले जात असतात. त्याला त्याच्यावरती एक लोखंडी रिंग आहे ती रिंग टाकली जात असते. याची जी कातडं आहे, ती कातडं भिजवलं जात, त्याला सुखवल केलं जातं. ते नरम झाल्यानंतर त्याला शिवून घेतलं जात आणि त्यावरती लोखंडे रिंग अंथरली जात असते. त्यामध्ये रस्सी मापाने तोडून घेऊन परत शिवली जाते आणि अशा प्रकारे ढोलाचे पान तयार केले जाते.