महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांना माणसं विविध मार्गाने आपलीशी करण्यात यश आले : शरद पवार - राज्यसभा निवडणूक निकाल महाविकास आघाडी

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची ( RS Election Mahavikas Aghadi ) काही मतं फुटल्याने भाजपचा उमेदवार विजयी झाला. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस ( Sharad Pawar On Devendra Fadnavis) यांना माणसं विविध मार्गाने यशस्वी करण्यात यश आले असल्याचे ( Sharad Pawar Rajya Sabha Election Result ) सांगितले.

harad Pawa
शरद पवार

By

Published : Jun 11, 2022, 10:14 AM IST

पुणे : मध्यरात्री उशीरा सुरू झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीला ( RS Election Mahavikas Aghadi ) मोठा धक्का बसला आहे. बऱ्याच राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून, भाजपाचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आपल मत व्यक्त केलं ( Sharad Pawar Rajya Sabha Election Result ) आहे.

ते म्हणाले की, मला स्वतःला या निकालाने कोणताही धक्का बसेल अश्या पद्धतीचा हा निकाल नाही. मतांची संख्या बघितली तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या उमेदवारांना जो कोटा दिला आहे त्यात कोणताही फरक पडलेला नाही. सहावी सीट जी शिवसेनेने लढवली त्यात मोठा गॅप होता. त्यात मतांची संख्या ही कमी होती.आम्ही प्रयत्न केला त्यात अपक्षाची मते भाजपकडे अधिक होती. आमच्याकडे कमी होती. तरीही ही अपक्षांची मते दोघानाही पुरेशी नव्हती. त्यामुळे भाजपने आम्हाला पाठिंबा देणारे जे अपक्ष होते त्यांना आपल्याकडे घेण्यासाठी जो काही यशस्वी कारवाई केली त्यात त्यांना यश आले. त्यामुळे हा फरक पडलेला आहे.आघाडीच्या संखेप्रमाने मत पडलेली आहे. जो चमत्कार झाला आहे तो मान्य केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांना माणसं विविध मार्गाने आपलीशी करण्यात यश आले आहे.स यावेळी पवार यांनी म्हटल आहे.

शरद पवार


यामुळे सरकार वर काहीही परिणाम होणार नाही. सरकार चालवण्यासाठी जो आकडा पाहिजे त्याला काहीही धक्का नाही. मला कुठेही काहीही झालेलं दिसत नाही. एक दोन मते इकडे तिकडे ज्यादा घेतली पण ती घेतली तरीही दुसऱ्या पसंतीला ती मिळाली, असं देखील यावेळी पवार यांनी यावेळी सांगितलं.


राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि शिवसेना यांच्या एकही मताला धक्का बसलेला नाही. आणि भाजपच्या एकही मताला धक्का बसलेला नाही. आत्ता राहिला प्रश्न हा तर अपक्षांचा तर अपक्षमध्ये गमती झाल्या आहेत. प्रफुल पटेल यांना जे ज्यादाच मत मिळालं आहे ते विरोधकांच एक मत आहे आणि त्याने मला सांगून ते दिलेलं आहे. हे भाजपच नाही तर भाजपबरोबर असलेल्या अपक्षाचे ते मत आहे, असं देखील यावेळी पवार म्हणाले.

हेही वाचा : Minister Jayant Patil : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर समाधानी नाही - मंत्री जयंत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details