महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis मी तुम्हाला महाराष्ट्रात नको आहे का ? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Devendra Fadnavis पुण्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis हे येणार आहे. तसेच ब्राह्मण महासंघाने काही दिवसांपूर्वी पुण्याच्या लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीस यांचा विचार करावं, असे पत्र भाजप अध्यक्षांना देण्यात आल आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिला आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

By

Published : Sep 2, 2022, 4:55 PM IST

पुणे पुण्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis हे येणार आहे. तसेच ब्राह्मण महासंघाने काही दिवसांपूर्वी पुण्याच्या लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीस यांचा विचार करावं, असे पत्र भाजप अध्यक्षांना देण्यात आल आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिला आहे. ते म्हणाले की मी पुण्याला पालकमंत्री म्हणून येणार नाही. आणि मी लोकसभा लढवावी अशी का तुमची इच्छा आहे. मी तुम्हाला महाराष्ट्रात नको आहे का ? असे यावेळी फडणवीस म्हणाले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन ई- बस डेपोचा उदघाटन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे स्टेशन डेपो येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गणेशोत्सवात मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. याबाबत देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांना विचारले असता, ते म्हणाले की अमित भाई दरवेळेस गणपतीला मुंबईमध्ये येत असतात. ते गणपतीचं दर्शन घेतात. ते येणार असल्याने आम्ही त्यांना विनंती केली आहे, की आमच्या बरोबर एक बैठक घ्या. आणि त्यानंतर ते एका शाळेचं उद्घाटन करण्यासाठी देखील जाणार आहे. एवढंच त्यांचं कार्यक्रम आहे, या व्यतिरिक्त त्यांच दुसर कोणताही कार्यक्रम नाही. असे यावेळी फडणवीसांनी सांगितले आहे.

मुंबई महानगरपालिका शिवसेना भाजप आणि मनसे यांनी एकत्र लढवावी. याबाबत फडणीस यांना विचारले असता ते म्हणाले की चर्चा आमच्याकडे नाही, पण तुमच्याकडे जास्त दिसत आहे. आज अतिशय ऐतिहासिक असा क्षण आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारतीय नवसैन्याची नवीन निशाणी झेंडा फडकवला आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील आमच्या नेवीच्या झेंड्यावर इंग्रजांचा चिन्ह होता. गुलामीच चिन्ह होत. आज ते चिन्ह काढण्यात आल आहे. आत्ता भारतीय नवसैन्याच नवं चिन्ह, नवीन निशाणी फडकत आहे. तमाम भारत वासियांसाठी ही अतिशय गर्वाची गोष्ट आहे. स्वराज्याची निशाणी असलेली शिवमुद्राची प्रेरणा घेऊन भारतीय नेवीची नवीन निशाणी झाली आहे, असे यावेळी फडणवीस म्हणाले.

आमचं प्रयत्न आहे, की पुणे हे पहिले शहर असं झालं पाहिजे, की जिथे शंभर टक्के आम्हाला अपारंपारिक स्त्रोतातून आमची मोबलिटी करता आली पाहिजे. 650 बसेस झाल्यानंतर देशात पुणे अग्रणी होणार आहे. विशेषता यासाठी जी सबसिडी लागते. ती केंद्र सरकार नी दिली आहे, त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो, असे देखील यावेळी फडणवीस म्हणाले आहेत. पुणे शहराची विभागणी केली पाहिजे, यावर फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले. आजतरी राज्य सरकार समोर असा कोणताही प्रस्ताव आणलेला नाही. भविष्यात हे खर आहे, की अस प्रस्ताव येऊ शकतो. पण आज तरी तो आलेला नाही. कुठेलेही वादाचे विषय करू नका आपल्याला विकास करायचं आहे, असे देखील यावेळी फडणवीस म्हणाले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भेट घेतली. यावर फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की अशोक चव्हाण यांनी कुठलीही माझी भेट घेतलेली नाही. एका ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी गेलो होतो. तेव्हा ते दर्शन घेऊन निघाले, तेवढ्यात मी पोहचलो. असे सगळ्यांच्या बाबतीत होत. मी कुठलीही भेट घेतली नाही, अस यावेळी फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचाAditya Thackeray criticizes इतर कोणाच्या नाही तर, बाप्पाच्या आशीर्वादामुळे कोरोनाचे सावट सरले; आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details