पुणे : महाराष्ट्रामध्ये युवा नेते शिवसेनेचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या नौटंकी करत आहेत. वेदांत फॉक्स्वान प्रकल्प ज्या जागी होणार होता, त्या जागी त्यांनी आंदोलन केलं. ती जागा तरी त्याने दिली होती का ? ती जागा सुद्धा दोन महिन्यापूर्वी आम्ही दाखवली, सगळं प्रस्तावाला होकार दिला होता. त्यामुळे आदित्य ठाकरे नौटंकी करत असून त्याचे राजकारण करत आहे. अशी टीका उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसयांनी पुण्यात आज आदित्य ठाकरे यांच्यावर केली (Devendra Fadnavis criticizes Aditya Thackeray) आहे.
राज्यात 'खोटं बोल पण रेटून बोल' कार्यक्रम सुरू -पुण्यातील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड एग्रीकल्चरच्या सर्वसाधारण सभेसाठी आज देवेंद्र फडणवीस पुण्यात आले (Devendra Fadnavis meeting in Pune) होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे. याचबरोबर जे मेडिकल डिवाइस औरंगाबादला जाणार आहे, त्याचा एक तरी कागद आदित्य ठाकरे यांनी दाखवावा. 'खोटं बोल पण रेटून बोल' असा कार्यक्रम सध्या राज्यात चालू असून त्याने महाराष्ट्र कधीच पुढे जाणार नाही. उलट महाराष्ट्राचे नुकसान होणार आहे. अडीच वर्षे तुम्ही सत्तेत होता, तुम्ही काय केलं ? त्यामुळे आम्ही आणखी जोमाने सगळ्या सुविधा देऊन, व्यापाराला अनुकूल वातावरण तयार करून महाराष्ट्र पुढे नेण्याची काम करू, असं सुद्धा देवेंद्र फडवणीस यांनी म्हटले आहे.
हमाल, माथाडी, कामगार या अशा संघटना आहेत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय नेते आहेत. त्यामुळे उद्योजकांना ब्लॅकमेल केले जातात. ते यापुढे खपून घेणार नाही. या सर्वांना सुद्धा अटक केली जाईल. जे खरे हमाल आहेत माथाडी कामगार आहेत. त्यांना सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे, पण त्यांच्या जीवावर जे राजकारण करतात ब्लॅकमेल करतात त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. यात काही माझ्या आघाडीतील नेते सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करेल असा इशाराआता देवेंद्र फडवणीस यांनी दिला (Devendra Fadnavis criticizes in Pune) आहे.