महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis Hindutva : हिंदुत्व आमच्या रक्तात, आमचा जन्मच हिंदुत्वातून झाला; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला - BJP polkhol sabha in Mumbai

अनेक पक्ष असतील ज्यांनी हिंदुत्वाची शाल पांघरली आहे. आम्हाला हिंदुत्वाची शाल पांघरायची गरज नाही. हिंदुत्व आमच्या रक्तात आहे. आमचा जन्मच हिंदुत्वातून झाला आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis on Shivsena over Hindutva ) यांनी शिवसेनेला लगावला आहे. पुण्यातील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.

Devendra Fadnavis
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

By

Published : Apr 19, 2022, 5:24 PM IST

Updated : Apr 19, 2022, 7:37 PM IST

पुणे - असे अनेक पक्ष असतील ज्यांनी हिंदुत्वाची शाल पांघरली आहे. आम्हाला हिंदुत्वाची शाल पांघरायची गरज नाही. हिंदुत्व आमच्या रक्तात आहे. आमचा जन्मच हिंदुत्वातून झाला आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Shivsena over Hindutva) यांनी शिवसेनेला लगावला आहे. महाराष्ट्राचे एक खूप मोठे साहित्यिक आहेत, त्यांनी 15 ते 20 वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहिले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे की हिंदुत्वाची शाल कोणी पांघरली आणि खरे हिंदुत्व कोणाच्या रक्तात आहे. हे मी कोणाला बोललो आहे हे त्यांनाही कळाले आणि जनतेलाही कळाले, असे फडणवीस (Devendra Fadnavis on Hindutva) म्हणाले.

फडणवीसांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन - भाजप : काल, आज आणि उद्या या पुस्तकाचे प्रकाशन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राम सातपुते, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे उपस्थित होते. हे पुस्तक शांतनू गुप्ता यांनी लिहिले असून, याचा मराठी अनुवाद मल्हार पांडे यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

कितीही हल्ले करा, आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढणारच - भाजपच्यावतीने मुंबई मनपाच्या कारभाराची पोलखोल करण्यासाठी ( BJP polkhol sabha in Mumbai ) सभेचे आयोजन केले होते. मात्र, त्याआधीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत स्टेज आणि साहित्याची तोडफोड केली. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि भाजपात वादाची ठिणगी पडली आहे. यावर फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, मला एकच गोष्टीचे समाधान आहे की आमचा घाव वर्मी बसला आहे. ज्याप्रमाणे आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढत आहोत त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना आता अस्वस्थता वाटत आहे. म्हणून ते आमच्या या यात्रेवर हल्ला करत आहेत. तुम्ही कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नाही. भ्रष्टाचार आम्ही काढतच जाऊ, असे देखील यावेळी फडणवीस म्हणाले.

राज ठाकरेंचे हिंदुत्व काळच ठरवेल -राज ठाकरे यांनी देखील आता हिंदुत्वाची शाल पांघरली असून, ती जुनी आहे की नवीन आहे यावर फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, हे तर काळच ठरवेल.

हेही वाचा-Devendra Fadnavis : संजय राऊत हे फ्रस्ट्रेटेड व्यक्ती, त्यांना कामं नाहीत, आम्हाला कामं आहेत : देवेंद्र फडणवीस

हेही वाचा-Hunar Haat Mumbai : मुंबईत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'हुनर हाट'चे उद्घाटन

हेही वाचा-Devendra Fadnavis Jay Shri Ram Slogan : ...अन् सभेत देवेंद्र फडणवीसांनी दिला 'जय श्रीराम'चा नारा

Last Updated : Apr 19, 2022, 7:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details